माणगांव तालुक्यातील इंदापूर येथे अनंत गितेंचा प्रचारास तूफान प्रतिसाद.
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
माणगाव :- बुधुवार दि .०३ एप्रिल रोजी तालुक्यांतील इंदापूर येथे रायगड रत्नागिरी लोकसभा चे निवडणुकिकरिता उभे आसलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोकप्रीय उमेदवार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे प्रचार सभा जोरदार पार पडले. या वेळी त्यांच्या सोबत आमदार संजय कदम, जिल्हा अध्यक्ष अनिल नवगने, माजी राजीप सदस्य सौ. स्वाती अनिल नवगने, ता. अध्यक्ष गजानन अधिकारि, शेकापचे ता.चिटणीस रमेश मोरे,उप जिल्हा प्रमूख नंदू शिर्के, जिल्हा सह समनवयक सुधिर सोनावणे, महीला जिल्हा संघटक डॉ. स्विटी गिरासे, ज्योत्स्ना दिघे, नाना जगताप,पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सदस्य उपस्थित होते. सदर कार्यक्रमास आदिवासीं महिला तसेच बांधव आणि नागरिक प्रचंड मोठा संख्येने उपस्थित होते.
आपला प्रमुख मार्गदरशन भाषण दरम्यान उपस्थित सर्वांचे स्वागत करून अनंत गीते यांनी खा. तटकरे यांच्यावर निशाण साधताना सांगीतले की सुनिल तटकरे हे घराणे साही चालवत आहे, सर्व महत्वाचे पदे आपला घरी ठेवले आहे, अनंत भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर आहे जसे सिंचन घोटाळा असो किंबहूना अनेक कंपनी चालवत आहे. तर माझ्या राजकीय काऱ्यकरदित माझ्यावर कदीच आरोपाचे डाग लागले नाही. खा तटकरे खंजीर खुपसन्यात माहेर आहेत. ज्या ज्या दिग्गज राजकीय नेत्यांनी तटकरे यांना मदत केली असे राष्ट्रवादी शरद पवार, शेकापचे जयंत पाटील आणि तयांना राजकीय क्षेत्रात बोट धरून आणलेल्या स्वर्गीय अंतुले साहेब यांच्यावर विश्वास घात केले आहे असे नाना विचार मांडले व अंती येण्यारा निवडणुकीत मला प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन अंती केले.