लोकनेते ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ घुग्घुस येथे बुथ प्रमुखांची बैठक संपन्न
🖋️साहिल सैय्यद…..
घुग्घुस तालुका प्रतिनिधि
📲 9307948197
घुग्घुस:- घुग्घुस: चंद्रपुर-वणी-आर्णी लोकसभेचे अधिकृत उमेदवार लोकनेते विकासपुरूष ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र घुग्घुस येथे शुक्रवार ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५:३० वाजता बैठक पार पडली.
सदर बैठक भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मुख्य मार्गदर्शक म्हणून भाजपाचे नामदेव डाहुले यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
सभेचे अध्यक्ष विवेक बोढे यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ सूचना दिल्या व प्रचाराचे नियोजन सांगितले.
यावेळी जि.प. माजी सभापती ब्रिजभूषण पाझारे, माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी उपसभापती निरीक्षण तांड्रा, नकोडा सरपंच किरण बांदूरकर, माजी सरपंच संतोष नुने, धानोरा सरपंच विजय आगरे, भाजपा जिल्हा सचिव विनोद चौधरी, माजी सदस्य साजन गोहने, सिनू इसारप, जेष्ठ नेते पुनम शंकर, चिन्नाजी नलभोगा, रमेश बुच्चे, युवामोर्चाचे अमोल थेरे, नकोडा माजी उपसरपंच ऋषी कोवे, नकोडा उपसरपंच मंगेश राजगडकर, सदस्य रजत तुराणकर, धानोरा ग्रामपंचायत सदस्य विनोद खेवले, वढा भाजपाचे बंटी भोस्कर, भाजपाचे सुनील बाम, तुलसीदास ढवस, श्रीकांत सावे, मल्लेश बल्ला, गणेश कुटेमाटे, शरद गेडाम, सिनू रामटेके, प्रवीण सोदारी, हेमंत पाझारे, साखरवाही भाजपाचे आशिष वाढई, नितीन काळे, राकेश भेदोडकर, चंद्रपूर विधानसभा ग्रामीण क्षेत्राचे शक्ती केंद्र प्रमुख, विस्तारक, बूथ प्रमुख, भाजपाचे पदाधिकारी आदिंची उपस्थिती होती.