आगीत लाखो रुपयांचे फर्निचर व चार चाकी वाहन जाळून खाक
✍️लुकेश कुकडकर ✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994
गडचिरोली : शहरातील चंद्रपूर मार्गावरील डोंगरे पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या फर्निचर व वाहन डेंटिंग व पेंटिंगच्या दुकानाला आग लागली. या आगीत चारचाकी, एक दुचाकी व लाखो रुपयांचे फर्निचर जळून खाक झाले. ही घटना शनिवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाने आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र साहित्य जळून खाक झाले.
चंद्रपूर मार्गावर टिनाच्या शेडमध्ये फर्निचर तसेच वाहन पेंटिंगचे दुकान आहे. रात्री ९ वाजता दुकाने बंद करून दोन्ही मालक घरी गेले होते. दरम्यान रात्री 10:15 वाजता वाहन पेंटिंगच्या दुकानाला अचानक आग लागली. ही आग पुढे बाजूलाच असलेल्या फर्निचरच्या दुकानात परसरली. शहरात महामार्गावर दुकान असल्यामुळे लोकांना आग दिसून आली. लगेच नागरिकांनी अग्निशमन दलाला बोलावले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत फर्निचरच्या दुकानातील सोफा, दिवाण, टेबल, आलमारी यासारखे लाखो रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाले. तसेच पेंटिंग करण्यासाठी ठेवलेली चारचाकी वाहने जळून खाक झाली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले.