अग्निशमन वाहन चंद्रपूर मनपा हद्दीबाहेर गेल्यास सेवा शुल्क.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर :- महानगरपालिका हद्दीबाहेर पुरविण्यात येणाऱ्या अग्निशमन वाहन सेवेच्या शुल्काच्या दराची निश्चीती करण्यात आली आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीच्या आजुबाजुला लहान मोठी गावे, जंगल आहे. या ठिकाणी आगीची घटना झाल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्याची जबाबदारी संबधीत स्थानिक प्राधिकरणाची आहे. पण, संबधीत स्थानिक प्राधिकरणाकडे कोणत्याही प्रकारची यंत्रणा अस्थित्वात नसल्यामुळे चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत सदर ठिकाणी सेवा पुरविण्यात येते. सदर ठिकाणे मनपा हद्दीबाहेर असल्यामुळे संबधीत स्थानिक प्राधिकरण / शासकीय कार्यालये तर्फे अग्निशमन सेवा शुल्क भरणा करणे गरजेचे आहे. त्याकरीता अग्निशमन सेवा शुल्क पहिल्या तासाला रु. २०००/- त्यानंतरच्या प्रत्येक तासाला रु. १००० /- प्रमाणे दरास स्थायी समितीने मंजुरी प्रदान केली आहे. याशिवाय अग्निशमन विभागातील तीन फायर टेंडर स्पेअर पार्टसह दुरुस्ती व देखभाल कामासाठी मंजुरी देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here