येत्या बुद्ध जयंतीला प्रकाशित होणाऱ्या शिवराय ते भिमराय या लेखसंग्रहाच्या प्रकाशनाच्या योजनेची आखणी

मीडिया वार्ता न्यूज
७ मे २०२२: मीडिया वार्ता न्यूज परिवाराचे विदर्भ अधिवेशन ६ मे रोजी चंद्रपूर येथे पार पडले. या अधिवेशनास मीडिया वार्ता न्यूजच्या नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली येथील प्रतिनिधीं सहभागी झाले होते.
बातम्या ज्या आपल्या ज्ञानात भर घालतील असे ब्रीदवाक्य असलेल्या मीडिया वार्ता तर्फे दरवेळी बातम्यांचे वृतांकन आणि माहितीपूर्वक लेख, समाजातील लोकांचे प्रश्न मांडणे याबाबत नव- नवीन उपक्रम राबवले जातात. सदर अधिवेशनाचे उत्कृष्ट रित्या आयोजन करत सह – संपादक श्री. मनोज खोब्रागडे यांनी उपस्थित प्रतिनिधींना मीडिया वार्ताच्या पुढील वाटचालीबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी मीडिया वार्तातर्फे येत्या बुद्ध जयंतीला प्रकाशित होणाऱ्या शिवराय ते भिमराय या विशेष लेखसंग्रहबद्दल चर्चा करण्यात आली आणि तसेच जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी सोशल मीडियाचा कसा योग्य वापर करता येईल, याबद्दल विचार विनिमय करण्यात आला.
सदर अधिवेशनास रवी अत्राम,धनराज वैरागडे,मिथुन लील्हरे,राजू झाडे, भीमराव देठे, हेमा मेश्राम, त्रिषा राऊत, मनोज कांबळे यांनी आपली मोलाची उपस्थिती दर्शविली होती.