अवकाळी पावसाचा वाऱ्यासह शिडकाव.. आंबा,तोंडली,पिकाची हानी

अवकाळी पावसाचा वाऱ्यासह शिडकाव..
आंबा,तोंडली,पिकाची हानी

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- असह्य उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्या जिवाला सुखद वाऱ्यांनी दिलासा दिला. पण हा वारा वादळी असल्याने धडकी भरवणारा देखील ठरला. रायगड मध्ये मंगळवारी वादळी वाऱ्यासह काही भागात अवकाळी पावसाचा शिडकावा झाला. बुधवारी संध्याकाळी देखील
अलिबाग तालुक्यातील काही गावांमध्ये वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची धांदल उडाली.
मागील काही दिवस तापमानाचा पारा अगदी 38,40 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहचला होता. तप्त उन्हाच्या झळा ,आणि अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारांनी जीव हैराण झाला होता. दरम्यान हवामान खात्याने उत्तर रायगड मध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज अखेर खरा ठरला.
मंगळवारी रात्री 9.00 नंतर वादळी वाऱ्यासह वीज चमकू लागली. ढग गडगडू लागले. काही भागात दमदार पाऊस झाला, तर काही भागात केवळ शिडकावा झाला. बुधवारी दुपार पर्यंत हवामान स्वच्छ होते. पण 4.00 वाजल्या नंतर काळे ढग दाटून आले. वारा देखील वाहत होता. धुळीचे वादळ ,झाल्याने वाहन चालकांना मोठ्या शिताफीने वाहने चालवावी लागली.दरम्यान या वादळी,पावसाने आंबा आणि तोंडली पिकाची काही प्रमाणात हानी केली.तसेच वीटभट्टी आणि बांधकाम व्यवसाय मिठागरे यावरही याचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
मांडवा ते गेट वे या जलप्रवासात अजंठा कंपनीची बोट सेवा खराब हवामानाचा अंदाज घेऊन बंद ठेवली असल्याचे सांगण्यात आले. उर्वरीत पीएन्पी आणि मालदार सेवा मात्र सुरू आहेत
रायगड जिल्ह्यात एकूण ७२.२ मिमी इतक्या पावसाची नोंद मंगळवारी सकाळी घेण्यात आली असाल्याची माहिती जिल्ह्य प्रशासनाकडून देण्यात आली आहे जिल्येह्थेयातील श्रीवर्धन तालुक्यात १२ मिमी इतका पावसाची नोंद झाली तर उरण महाड पोलादपूर या तालुक्यात
पाऊस पडलाच नाही. उर्वरित तालुक्यात अलिबाग १.०० मिमी, पेण २.०० मिमी, मुरुड ५.०० मिमी, पनवेल २.२ मिमी, कर्जत ४.२ मिमी, खालापूर ४.०० मिमी, माणगाव १.०० मिमी, रोहा ५.०० मिमी, सुधागड ४.०० मिमी, म्हसला १०.०० मिमी आणि माथेरान १०.८मिमि इतकी नोंद झाली आहे तामिळनाडू ते मनार च्या आखातापार्यंत कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाल्याने अजून ४ दिवस पाऊस पडणार आहे