उन्हाळी क्रीडा कौशल्य व व्यक्तिमत्व विकास शिबिर प्रशिक्षणास प्रारंभ…..
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड – अलिबाग यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील मुला-मुलींना विविध खेळ माहिती व्हावे तसेच या खेळांच्या माध्यमातून चांगले खेळाडू तयार व्हावे याकरिता दीड महिना मोफत उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सदर प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी या कार्यक्रमास मान्यवर म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांसह जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ, प्रशिक्षक पुरुषोत्तम पिंगळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी गोंधळी, यतिराज पाटील, जगदीश मरागजे, रिकी अगरवाल, धनंजय कवठेकर, दिव्या मोकल, नागेश शिंदे, ऋषिकेश राऊत, आशिष पाटील,भरत प्रल्हाद गुरव, प्रियांका गुंजाळ, संतोष प्रभाकर जाधव,
वीरेंद्र पवार, माधवी पवार, भक्ती तिवारी, देवीदास महादेव पाटील, हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर,
भरत गुरव, संदीप गुरव, तुषार मढवी यांसह प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेले बहुसंख्य खेळाडू व पालक वर्ग उपस्थित होता. या शिबिराचे उद्घाटन भारताला ऑलिम्पिक मध्ये कुस्ती खेळात पहिले वयक्तिक ऑलिम्पिक पदक प्राप्त करून देणारे खशाबा जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. यावेळी अभिजीत शिवथरे अप्पर पोलीस अधीक्षक रायगड यांनी खेळाडूंना क्रीडा कौशल्याच्या बळावर वेगवेगळ्या क्षेत्रात संधी मिळते तसेच खेळाडूंना बहुमोल मार्गदर्शन करून या प्रकारच्या शिबिरांमधून ऑलम्पिक खेळाडू तयार व्हावा अशा शुभेच्छा दिल्या. शिक्षणासोबत खेळाची जोडणी असणे आजच्या स्पर्धेच्या युगात गरजेचे आहे तसेच खेळामध्ये राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना गुणपत्रिकेत गुणांची जोड मिळत असल्याने अशा शिबिरांचे आयोजन ही विद्यार्थ्यांना मिळालेली सुवर्णसंधी आहे असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी महारुद्र नाळे यांनी केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांनी केले दीड महिना चालणाऱ्या या प्रशिक्षण शिबिरात लगोरी सारख्या पारंपारिक खेळापासून आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या नेमबाजी सारख्या विविध खेळाचे प्रशिक्षण तंत्रशुद्ध पद्धतीने देण्यात येणार आहे साधारणतः 150 पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींचा सहभाग या शिबिरात असून अशा शिबिरांमधून प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींमधून उद्याचे राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू निर्माण व्हावेत या उद्देशाने हे आयोजन केले असल्याचे आपल्या प्रास्ताविकात सांगितले. तर जगदीश मरागजे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यानंतर नेमबाजी कराटे तायक्वांदो लाठीकाठी लगोरी यांसारख्या विविध खेळांची प्रात्यक्षिके झाली व मान्यवरांनी देखील बॅडमिंटन खेळून खेळाडूंना प्रोत्साहित केले.
सर्वसामान्यांच्या समस्या, सर्व सामान्यांचे प्रश्न
सर्वसामान्यांच्या बातम्यांनाच, आम्ही देतो महत्त्व
आज आपल्या विश्वासाबरोबरच मीडिया वार्ता न्यूजला गरज आहे, आपल्या मदतीची. आपली छोटीशी मदत या फेक न्यूजच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या बातम्यांना वाचा फोडून प्रामाणिकपणे काम करण्यासाठी लाखमोलाची ठरू शकते.