ग्रुप ग्रामपंचायत दिघीला आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार २०२५ ने तर कुमार विपुल रमेश गोरिवले यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित
✍️ सचिन सतिश मापुस्कर✍️
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
📞8698536457📞
श्रीवर्धन :- दिनांक १६ एप्रिल २०२५ रोजी श्रीवर्धन तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दिघीला दैनिक मीडिया वार्ता न्यूज यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव २०२५ निमित्त आयोजित कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातून आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार 2025 पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात मीडिया वार्ताचे संपादक श्री.भागुराम सावंत, श्री. मंगेशभाई सावंत आणि कॅप्टन रंधावा हस्ते ग्रुप ग्रामपंचायती चे सरपंच कुमार विपुल रमेश गोरीवले, उपसरपंच गोपाळ महादेव मेंदाडकर व ग्रामसेवक अनंत बापू सुळ यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन प्रदान करण्यात आला.
ग्रुप ग्रामपंचायत दिघी ने १५ व्या वित्त आयोग आराखड्या मध्ये शिक्षण,आरोग्य,स्वच्छता अंतर्गत दिघी ,नानवली -मनेरी ,करलास मधील रायगड जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी यांना वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वाटप केले. सर्व अंगणवाडी ना रंगारंगोटी तसेच दुरुस्तीची कामे करण्यात आली. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा दिघी यांना सीसीटीव्ही कॅमेरे,कॉम्प्युटर व प्रोजेक्टरचेही वाटप ग्रुप ग्रामपंचायतीकडून करण्यात आले तर अ.स.ई.अंतुले हायस्कूल दिघीला ग्रामनिधीतून मुलामुलींसाठी शौचालय बांधून दिली तर गरोदर माता व कुपोषित बालकांसाठी पौष्टिक आहार देण्यात आला. ग्रामपंचायत च्या मार्फत आरोग्यचे कॅम्प घेण्यात आले. त्याचप्रमाणे गावामध्ये स्वच्छता राहावी याकरिता घंटागाडीची सुविधा ग्रामपंचायत मार्फत करण्यात आली सांडपाण्यासाठी शोष खड्डे करण्यात आले. तसेच गावातील रस्ते RCC चे बांधण्यात आले.आदिवासी पाडयातील ग्रामस्थांसाठी ग्रुप ग्रामपंचायत दिघी मार्फत गृह उपयोगी वस्तुचे वाटप करण्यात आले.लाईटची सोय म्हणून सोलर लाईट गावात बसविण्यात आली. या प्रकारे ग्रुप ग्रामपंचायतीने १५ वित्त आयोग आराखड्यात विविध कामांना प्राधान्य देऊन दिघी करलास, मनेरी नानवेल या गावाच्या विकासाकडे प्राधान्याने लक्ष देऊन दिघी ग्रामपंचायत ही आदर्श ग्रामपंचायत होईल याकडे लक्ष दिले शिव-शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारसरणीला ध्येय मानून समाजसेवेचे व्रत घेतले याची दखल दैनिक मीडिया वार्ता न्यूज ने घेतली व ग्रुप ग्रामपंचायत दिघीला आदर्श ग्रामपंचायत २०२५ ने छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामुळे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच यांनी आपल्या मनोगतात दैनिक मीडिया वार्ता न्यूज चे खूप आभार मानले आहेत
त्याचप्रमाणे ग्रुप ग्रामपंचायत ने आणखीन एक मान मिळवला तो म्हणजे श्रीवर्धन तालुक्यातील नानवेली मनेरी गावचे सुपुत्र सामाजिक,शैक्षणिक,क्रीडा तसेच विविध क्षेत्रात अग्रेसर असलेले दिघी ग्रुप ग्रामपंचायत चे सरपंच कुमार विपुल रमेश गोरीवले यांना नामवंत अशा नालंदा ऑर्गनायझेशन या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र रत्न आदर्श सरपंच पुरस्कार माननीय शेषराव पाटील, आय एफ एस अधिकारी जितेंद्र तुळशीराम दाते, प्राध्यापक मनोज वाबळे अध्यक्ष शब्द धन सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला त्यामुळे दिघी पंचक्रोशी सह सर्वत्र अभिनंदन व त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे. लोक कल्याणासाठी सदैव तत्पर असलेल्या नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य ही संस्था कला आणि विद्या शिक्षण क्रांतीचा केंद्र बिंदू म्हणून ओळखली जाते. सदरील संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात त्यांच्या वतीने महाराष्ट्र सन्मान सोहळा तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान या संस्थेच्या वतीने करण्यात येत असून श्रीवर्धन तालुक्यातून यावर्षी दिघी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय श्री विपुल रमेश गोरीवले यांना सन्मानित करण्यात आले ही श्रीवर्धन करांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे अशा प्रकारे ग्रुप ग्रामपंचायत ला एकाच वेळी दोन्हीकडील पुरस्कार मिळाल्याने ग्रुप ग्रामपंचायत दिघीचे तालुक्यातून खूप कौतुक करण्यात येत आहे श्रीवर्धन तालुक्याचे गटविकास अधिकारी माननीय श्री माधव जाधव साहेब यांनी सुद्धा ग्रुप ग्रामपंचायतीचे अभिनंदन करून माननीय सरपंच विपुल गोरीवले व उपसरपंच गोपाळ मेंदाडकर व ग्रामसेवक अनंत बापू सुळ यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा दिल्या आहे.