राज्यमंत्र्यांनी कोरोना बाधितांमध्ये जागविला विश्वास; जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचा कोविड सेंटरमध्ये मुक्काम.

46

राज्यमंत्र्यांनी कोरोना बाधितांमध्ये जागविला विश्वास; जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचा कोविड सेंटरमध्ये मुक्काम.

रूग्णांशी संवाद व जेवण.

🖋मनोज खोब्रागडे🖋
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
अमरावती :- जलसंपदा, शालेय शिक्षण व कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी चांदुरबाजार येथील कोविड सेंटरमध्ये एक दिवस मुक्काम करत रूग्णांमध्ये विश्वास जागविला.

कोरोना हा योग्य उपचारांनी बरा होतो. त्यामुळे घाबरून जाण्यासारखे काही नाही. वेळीच उपचार व आवश्यक दक्षता घेतली तर कोरोनावर मात करता येते. आपण स्वत:ही या आजारावर मात केली आहे. आत्मविश्वास कुठेही हरवता कामा नये. आत्मविश्वासाने उपचारांना प्रतिसाद मिळतो व व्यक्ती बरी होते, अशा शब्दांत राज्यमंत्री श्री. कडू यांनी रुग्णांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रत्येकाची विचारपूस केली.

यावेळी रूग्णांसोबत संवाद साधत त्यांनी सर्वांना जेवणदेखील दिले. त्यावेळी नितीनभाऊ कोरडे, रहमान भाई, मुझफ्फर हुसेन, गणेश पुरोहित, सचिन खुळे, शिशिर माकोडे, जावाभाई, दिनेश कथे, राज्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक गोलूभाऊ ठाकुर, संजय गोमकाळे, सलीम भाई सरकार, राजेश पखाले, दीपक भोंगाडे, मयुर ठाकरे,उमेश कपाळे, ऋषभ गावंडे, आबुभाऊ वानखडे व आरोग्य अधिकारी कर्मचारी व प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.