स्व. सुरेशभाऊ देशमुख यांना पालकमंत्र्यांकडून श्रद्धांजली.

🖋मनोज खोब्रागडे🖋
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
अमरावती :- भातकुली तालुक्यातील विर्शी येथील पंजाबराव कुचे विद्यालयाचे अध्यक्ष स्व. सुरेशभाऊ हरिभाऊ देशमुख यांना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
विर्शी येथे झालेल्या श्रद्धांजली सभेत पालकमंत्र्यांसह जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयंतराव देशमुख, हरीभाऊ मोहोड, मुक्कदरखाँ पठाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्व. सुरेशभाऊ देशमुख हे अनेक वर्षांपासून सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत होते. त्यांनी शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात मोलाची कामगिरी केली. ते संयमी व खंबीर होते. ग्रामीण परिसरात शिक्षण क्षेत्रात महत्वाची कामगिरी त्यांनी केली. आपल्या सुस्वभावाने अनेक जिव्हाळ्याची माणसे जोडली. त्यांच्या निधनाने कधीही भरून न येणारी हानी झाली असल्याची भावना पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. विविध मान्यवरांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.