शिवराया विद्यार्थी संघटना तर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नव्याने रुजू झालेले मंडळ अधिकारी संजय भोंग यांना आंब्याचे वृक्ष व शाल श्रीफळ देऊन स्वागत.

55

शिवराया विद्यार्थी संघटना तर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नव्याने रुजू झालेले मंडळ अधिकारी संजय भोंग यांना आंब्याचे वृक्ष व शाल श्रीफळ देऊन स्वागत.

शिवराया विद्यार्थी संघटनेच्या मागणीला अखेर यश..

शिवराया विद्यार्थी संघटना तर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नव्याने रुजू झालेले मंडळ अधिकारी संजय भोंग यांना आंब्याचे वृक्ष व शाल श्रीफळ देऊन स्वागत.
शिवराया विद्यार्थी संघटना तर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नव्याने रुजू झालेले मंडळ अधिकारी संजय भोंग यांना आंब्याचे वृक्ष व शाल श्रीफळ देऊन स्वागत.

प्रा. अक्षय पेटकर वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी✒
अल्लीपुर;- शिवराया विद्यार्थी संघटनेच्या वतीने अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या मंडळ अधिकारी पदासाठी योग्य असलेले संजय भोंग हे मंडळ अधिकारी म्हणून नियुक्त करावे अशी अनेक दिवसांपासून प्रशासनाकडे विविध माध्यमातून मागणी शिवराया विद्यार्थी संघटनेने रेटून धरली होती आणि अखेर शिवराया विद्यार्थी संघटनेच्या पाठपुराव्याला उशिरा का होईना पण यश आले आहे आणि नुकतेच संजय भोंग हे मंडळ अधिकारी म्हणून अल्लीपुर येथे रुजू झाले आहे. त्यांच्या स्वागतासाठी म्हणून आज पर्यावरण दिनी आंब्याचे वृक्ष व शाल श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करत त्यांना गावातील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी अनेकानेक शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांच्या हस्ते आंब्याचे झाड देत वृक्षारोपण त्यांच्याच कार्यालयात करण्यात आले.

संजय भोंग हे अल्लीपुर येथे आधी तलाठी म्हणून कार्यरत होते. सर्वाधीक लोकप्रिय तलाठी असणारे ते एकमेव महसूल अधिकारी आहे. आपल्या कामातूनच त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली असून सध्या मंडळ अधिकारी पदि नियुक्ती मिळाल्याने अल्लीपुर सर्कल मधिल शेतकऱ्यांचे अडून असलेले अनेक काम मार्गी लागतील अशी अपेक्षा शिवराया विद्यार्थी संघटनेला आहे. यावेळी अल्लीपुर तलाठी संदीप कर्नाके शिवराया विद्यार्थी संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष विद्यार्थीमित्र नितीन सेलकर, विकास गोठे, दिनेश गुळघाणे, श्रुनय ढगे, आशिष जबडे, विक्की वैद्य, निशांत लांभाडे,मयूर डफ, रोषन नरड,  आकाश घुसे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.