लोहिया विद्यालयात शिवस्वराज्य दिन सोहळा संपन्न.

✒त्रंबक सातकर, गोंदीया जिल्हा प्रतिनिधी✒
सौंदड:- येथील लोहिया शिक्षण संस्था सौंडद द्वारा संचालित रामेश्र्वरदास जमनादास लोहिया माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय, जमुनादेवी प्राथमिक शाळा,सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.६जून २०२१ला छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवस्वराज्य दिनाचा कार्यक्रम विद्यालयात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ,लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक – अध्यक्ष मा.जगदीश लोहिया यांनी विद्येची देवता माता सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदीश लोहिया यांनी शिवरायांच्या कार्याचे महत्त्व सांगून शिक्षकांना मार्गदर्शन केले तसेच पर्यवेक्षिका सौ.कल्पना काळे, प्राचार्य गुलाबचंद चिखलोंढे, मुख्याध्यापक मनोज शिंदे, टी.बी.सातकर-स. शि, डी.एस.टेम्भुरने- स. शि. व पी.एस. कापगते-स.शि.यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी कोविड-१९ च्या नियमांचे काटेकोर पालन करून कार्यक्रम संपन्न करण्यात आले. यावेळी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन कु. डोये यांनी केले तर आभार श्री. दरवडे यांनी मानले.