हिंगणघाट नपच्या प्रभाग क्र ३ येथील तोडण्यात आलेल्या रोडची दुरुस्त करण्याची मागणी.

50

मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीफ✒
हिंगणघाट:- येथील नपच्या प्रभाग क्र.3 अंतर्गत येणाऱ्या संत ज्ञानेश्वर वॉर्ड येथील श्री . विनायक चौधरी ते श्री.भारत येणोरकर यांच्या घरा पर्यंतचा तोडण्यात आलेला मार्ग नव्याने तयार करून द्यावा अशी मागणी प्रभागाच्या नगरसेविका सौ संगीता बंटी वाघमारे व प्रभागातील नागरिकांकडून एका निवेदनातून करण्यात आलेली आहे.

निवेदनातून देण्यात आलेल्या माहितीनुसार तीन वर्षापूर्वी अमृत योजनेच्या मलनि:सारण योजनेत हा रस्ता तोडण्यात आला तेव्हा पासून आज पर्यंत त्याला तयार करण्यात आला नाही . हा रस्ता अतिशय रहदारीचा असून या मार्गावर मोठया वर्दळीचे शहालंगडी मदीर , तसेच मोठे तीन भवन आहे. लोकांचे जाणे- येणे जास्त प्रमाणात असल्याने कधीही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरातील नागरीकांना यामुळे नेहमीच अपघाताचा सामना करावा लागतो. हा रस्ता अमृत योजनेत किंवा इतर योजनेत तयार करुन द्यावा अन्यथा या रस्त्याबाबत आंदोलनाची भुमिका घ्यावी लागेल असा इशारा निवेदनातून प्रभागातील नगरसेविका आणि नागरीकानी निवेदनात द्वारे केली आहे.भविष्यात एखाद्याचा या अर्धवट नादुरुस्त रस्त्याने अपघात होऊन काही बरेवाईट झाले तर याची सर्व जबाबदारी आमदार, नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकारी यांच्यावर राहील असे निवेदन नगसेविका सौ.संगिता बंटी वाघमारे व प्रभागातील नागरीक यांनी प्रशासनाला दिले आहे.