महिला सक्षमीकरणासाठी शिवणयंत्र वाटप
श्री व्हिजनस् आणि डिजिटल स्किल्स यांचा उपक्रम
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:श्री व्हिजनस् आणि डिजिटल स्किल्स यांच्या संयुक्त सहकार्याने “महिला सक्षमीकरण उपक्रमांतर्गत शिवणयंत्र वाटप” हा कार्यक्रम उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
या उपक्रमाअंतर्गत महिला बचत गटांतील महिलांना शिवणयंत्र आणि प्रशिक्षणानंतरचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
याकार्यक्रमास .आ. महेंद्र दळवी यांच्या वतीने कन्या जुईली दळवी तसेच सौ. संजीवनी नाईक याही विशेष उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीमुळे महिलांना विशेष प्रेरणा लाभली. त्यांनी महिलांना शुभेच्छा देताना सांगितले की, “स्वावलंबनासाठी असे उपक्रम अत्यंत गरजेचे आहेत.”
कार्यक्रमात डिजिटल स्किल्स संस्थेच्या प्रमुख सौ. सोनल हर्षल कदम, श्री व्हिजनचे विशाल घरत, तसेच पर्यावरण फाउंडेशन आणि अवनी हेल्पो फाउंडेशनचे प्रतिनिधी, स्थानिक पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गटांच्या प्रमुख व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.