*ब्रम्हपुरी शहर शिवसेनेचा अल्टीमेटम*
*आवळगाव रेती घाटावर होणाऱ्या अवैध रेती तस्करीवर तात्काळ अंकुश लावा*
*तीव्र आंदोलनाचा ईशारा, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन*

*आवळगाव रेती घाटावर होणाऱ्या अवैध रेती तस्करीवर तात्काळ अंकुश लावा*
*तीव्र आंदोलनाचा ईशारा, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन*
ब्रम्हपुरी:-
तालुक्यात सध्यस्थीतीत कुठल्याही रेतीघाटाचा प्रशासनाकडून लिलाव झाला नसतांना, आवळगाव घाटावर माईनींग च्या नियमाला बगल देत, सरकारचे स्वामींत्वधन मोठ्या प्रमाणात चोरी करत अवैध तस्कर हजारो ब्रास रेती उपसा करीत असून, नाहक नागरिकांस वेठीस धरल्या जातं आहे, नागरिकांना होणाऱ्या आर्थिक व मानसिक त्रासाची दखल प्रशासन घेत नसून तसेच एकही घाट सुरू नसताना शहरात मोठ्या प्रमाणात रेती येथे कुठून? तालुका महसूल प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे व नैसर्गिक साधन संपत्ती ची लूट ब्रम्हपुरी तालुक्यात सुरु असल्याने तालुका शहर शिवसेनेच्या वतीने आवळगाव घाटावर रात्रभर चालत असलेल्या अवैध रेती तस्करीवर अंकुश लावण्यात यावे
उत्खदन होत असलेल्या घाटाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी अशी मागणी तालुका शहर शिवसेनेनी केली असून दोषीवर योग्य ती न्यायिक दंडात्मक कारवाही न झाल्यास शिवसेना स्वतः अवैध तस्करीतील वाहणावर कारवाही करण्यात येऊन तहसील कार्यालयासामोरं लवकरच तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्यात येईल. असा ईशारा तालुका शहर शिवसेने च्या वतीने उप विभागीय अधिकारी यांना निवेदना द्वारे देण्यात आला सदर निवेदन देतांना शिवसेना शहर प्रमुख नरेंद्र नरड,सरपंच केवळराम पारधी,पराग माटे, अमोल माकोडे,आशिष गाडलेवार,खुर्शीद शेख,अमोल ठिकरे,लोकेश अंबादे सर्व शिवसैनक उपस्थित होते