पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे पावसात मोठा खंड पडल्याने दुबार पेरणीचे संकट गडद झाले असतानाच आता पावसाला पोषक हवामान राज्याच्या अनेक भागांत ढगाळ हवामान तयार होत आहे

पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे

पावसात मोठा खंड पडल्याने दुबार पेरणीचे संकट गडद झाले असतानाच आता पावसाला पोषक हवामान

राज्याच्या अनेक भागांत ढगाळ हवामान तयार होत आहे

जिल्ह्यात 90 टक्के पेरण्या पूर्ण; पण वरुणराजा देतोय हुलकावणी
वरुणराजा देतोय हुलकावणी

प्रा.अक्षय पेटकर
उपजिल्हा प्रतिनिधी वर्धा
9604047240

पुणे : पावसात मोठा खंड पडल्याने दुबार पेरणीचे संकट गडद झाले असतानाच आता पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. राज्याच्या अनेक भागांत ढगाळ हवामान तयार होत असून वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह गुरुवारपासून (८ जुलै) पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
कोकण, विदर्भात अनेक ठिकाणी, तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात काही ठिकाणी आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जिल्हानिहाय पावसाचा विचार केल्यास बुधवारी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, नगर आणि नाशिक, मराठवाडय़ातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबाद, तर विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्य़ांत वादळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
पाऊसभान..
नैर्ऋत्य मोसमी वारे सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. त्यानुसार गुरुवारपासून (८ जुलै) राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यालगत रविवापर्यंत (११ जुलै) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.