*भाजपा महानगर जिल्हा चंद्रपूरची पर्यावरण कार्यकारणी जाहीर.*

✒जिजा गुरले✒
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्यु-95298 11809
चंद्रपूर : -भारतीय जनता पार्टी जिल्हा महानगराचे संघटन मजबूत करण्याचा उपक्रम सद्या राबविल्या जात आहे.या अनुषंगाने गुरुवार 5 ऑगस्ट ला भाजपा पर्यावरण समिती कार्यकारिणीची घोषणा भाजपा चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी केली आहे. भाजपा महानगर जिल्हा चंद्रपूर पर्यावरण समिती कार्यकारणीच्या अध्यक्षपदी प्रीती मनीष भुषणवार यांची तर महामंत्री म्हणून अमित कासनगोट्टूवार,उपाध्यक्ष पदी प्रतीक तिवारी तर सचिव पदी अविनाश उत्तरवार, सहसचिव निलेश चकनलवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.कार्यकारिणीच्या सदस्य पदी रामचंद्र डोंगरावार,मंजुषा हलकरे,सौरभ डोंगरे,सुमित तिवारी,अमीन जिवानी, प्रणव भुषणवार, यांची नियुक्ती करण्यात आली आहे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे माजी वित्त मंत्री आ सुधीरभाऊ मुनगंटीवार,माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर,भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,विधानसभा प्रमुख प्रमोद कडू,महापौर राखी कंचर्लावार,उप महापौर राहुल पावडे,सभापती रवी आसवानी,संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,महामंत्री ब्रिजभूषण पाझारे,सुभाष कासनगोट्टूवार, रवींद्र गुरनुले, महिला मोर्चा अध्यक्ष अंजलीताई घोटेकर,भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर आदींनी अभिनंदन केले आहे.