तूर शेतमालाचे उत्पादन वाढण्यासाठी शेंडे खुडणी करावी

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961
बुलडाणा : – तुर हे राज्यात घेतल्या जाणा-या कडधान्य पिकापैकी प्रमुख नगदी कडधान्य पिक आहे. तुर पिकाची पेरणी साधारणत: जुन चा दुसरा आठवडा ते जुलैचा पहीला आठवडा या दरम्यान पुर्ण होते. तुरीचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने तुरीचे शेंडे खुडणे व्यवस्थापन महत्वाचे ठरते. ही शेंडे खुडणी तुर पिक 45 दिवसाचे झाल्यानंतर पहिली खुडणी व 65 दिवसानंतर दुसरी खुडणी पुर्ण करावी. तुरीचे शेंडे खुडल्याने फांद्यांची संख्या वाढते. तुरीची अनावश्यक वाढ कमी होते. तुर जास्त उंच न वाढल्यामुळे औषध फवारणी सुलभ होते. फांद्यांची संख्या वाढल्यामुळे फुलांची व शेंगांची संख्या वाढते. उत्पादनात 10 ते 15 टक्के वाढ होते.
तुरीचे शेंड खुडल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे तुरीचे उत्पादनात वाढ झाली आहे. विजय रामराव सोळंकी मु. कोलारा, ता. चिखली यांनीसुद्धा शेंडे खुडल्यामुळे उत्पादनात वाढ झाल्याचा त्यांना अनुभव आहे. शेंडे खुडण्यापुर्वी उत्पादन एकरी 05 क्विंटल होते. परंतु शेंडे खुडणी केल्यामुळे त्यांचे एकरी 07 क्विंटल पर्यंत वाढले. शेतकरी सुनिल सुर्यनारायन कणखर मु. वरखेड यांच्या शेतात तुरीचे शेंडे खुडणीमुळे एकरी 11 क्विंटल उत्पादन झाले. वरील फायदे विचारात घेता तुर पिकाची उत्पादनात वाढ करण्यासाठी मोहिम स्वरुपात शेंडे खुडणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.