अखेर तिने पोलीस स्टेशनच्या आवारातच केले विषप्राशन

अश्विन गोडबोले

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 📱 8830857351

वरोडा, 7 ऑगस्ट: आपल्यावर अत्याचार करणाऱ्या इसमाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देणाऱ्या महिलेला योग्य न्याय न मिळाल्यामुळे त्या महिलेने तीन दिवसांपूर्वी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केल्याप्रमाणे ७ ऑगस्ट रोज सोमवारला. वरोरा येथील पोलीस स्टेशनच्या आवारात विष प्राशन केले. तिला तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर संबंधित महिलेची प्रकृती बघता तिला चंद्रपूरच्या सार्वजनिक रूग्णालयात पाठविण्यात आले .

खांबाडा येथील रहिवासी महिलेने २ ऑगस्ट रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे एक तक्रार दिली होती. त्या तक्रारीत शेख इरफान याने आपल्यावर अत्याचार केला असून शेख इरफान व आरोपीचे भाऊ शेख रिजवान हे आपल्यावर तक्रार परत घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचे म्हटले होते .

या प्रकरणाचा तपास वरोडा पोलिस ठाण्याचे एपीआय निलेश चवरे यांच्याकडे देण्यात आला होता.

परंतु दारूचा अवैध धंदा करणारे आरोपीचे भाऊ शेख रिजवान यांच्याशी चवरे यांचे आर्थिक संबंध असल्यामुळे आपल्या प्रकरणात एपीआय चवरे हे आपल्या तक्रारीची दखल घेत नव्हते असा आरोप महिलेने तक्रारीत केला होता.

आरोपीच्या नातेवाईकाने खांबाळा येथील एका हॉटेलमध्ये 22 जून रोजी आपल्याला बेदम मारहाण केली त्यानंतर या घटनेची तक्रारही पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली यासंदर्भात गुन्हे दाखल झाल्यानंतरही आरोपींना अटक करण्यात आली नसल्याने माझ्या जीविताला धोका असल्याचा आरोपही महिलेने केला होता.

आरोपी शेख रिजवान ,शेख मोहसीन, शेख दानिश व शेख मोहम्मद यांना तात्काळ अटक करावी व या प्रकरणाचा तपास निलेश चवरे यांच्याकडून काढून घेण्यात यावा अशी मागणी करत ही अटक न झाल्यास आपण 7 ऑगस्ट रोज सोमवारला विष प्राशन करू असा इशारा पिडीत महिलेने तीन दिवसापूर्वी येथील यश पॅलेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला होता.

महिलेने दिलेल्या कालावधीत कोणतीही कारवाई न झाल्याने तिने ठरवल्याप्रमाणे आज दुपारी वरोडा पोलीस स्टेशनच्या आवारात विष प्राशन केले .

महिलेला तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तिची प्रकृती बघता चंद्रपूरच्या सार्वजनिक रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पोलीस आवारात तक्रारकर्त्याने विष प्राशन केल्याने एकच खळबळ माजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here