आंबेवाडी नाक्यावर आज्ञात चोरट्यांनी केले मोबाईल ची बॅग लंपास, सर्वत्र एकच खळबळ

50

आंबेवाडी नाक्यावर आज्ञात चोरट्यांनी केले मोबाईल ची बॅग लंपास, सर्वत्र एकच खळबळ

तेजपाल जैन 

मो: 8928847695

कोलाड प्रतिनिधि 

कोलाड आंबेवाडी नाक्यावर शुक्रवारी ४ ऑगस्ट रोजी रात्री९.०० वाजण्याच्या सुमारास एक खळबळजनक घटना घडली असून सदरच्या घटनेत एका आज्ञात चोरट्याने दुकानदाराचे २१९५०० रुपये किंमतीचे विविध प्रकारच्या कंपनीचे मोबाईल तसेच ठेवलेली मोबाईलची पिशवीच लंपास केल्याने कोलाड आंबेवाडी नाक्यावर एकाच खळबळ उडाली आहे तर सदरच्या घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिस उपनिरीक्षक ए एस साबळे तसेच त्यांचे सहकारी यानी घटनास्थली भेट देऊन घटनेची पाहणी केली.

या बाबत कोलाड पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार शिवा सुबिर करमोकर वय ३०, रा. रूम नं ४०२ स्वामी हिरीटेज ए विंग सेवा दल आळी रोहा, रायगड, महाराष्ट्र यांचे कोलाड आंबेवाडी नाक्यावरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील खबर देणार यांनी त्यांचे न्यु टाईम सेंटर अन्ड मोबाईल दुकानामधून वरील किमतीचे मोबाईल तीन पांढ-या रंगाची कापडी पिशवी त्यावर विमल असे लिहीलेले यामध्ये ठेउन त्या कापड़ी पिशव्या दुकानामधून बाहेर घेऊन येऊन दुकानाचे शटर लाउन त्या पिशव्या दुकानाच्या व्हराडयात ठेऊन समोरील रोडवरील असलेल्या गाडीचे लॉक उघडण्याकरीता गेले असताना त्यापैकी एक कापडी पिशवी मधील वरील वर्णनाचे व किमतीचे १६ मोबाईल असा एकूण २१९५०० रुपयाचा माल खबर देणाराच्या संमतीशिवाय कोणीतरी अज्ञात चोरटयाने लबाडीचे उददेशाने स्वतःच्या फायदयाकरीता चोरी करून घेउन गेला.

पोलीस ठाणे गुरन कोलाड पोस्टे गुरनं ००७६/२०२३ भा.दं.वि.क.३७९,३७९ प्रमाणे याची नोंद करण्यात आली असून कोलाड पोलीस निरिक्षक ए एस साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अमलदार एन डी चव्हाण अधिक तपास करीत आहेत.