सुरजागड लोहखाणीत भीषण अपघात, तरूण अभियंत्यासह दोन मजुरांचा दुर्दैवी अंत

अश्विन गोडबोले

विशेष प्रतिनिधी

📱 8830857351

गडचिरोली : जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात सुरजागड येथे सुरू असलेल्या लोहखाणीत झालेल्या अपघातात एका अभियंत्यासह दोन मजूर असे एकूण तिघेजण ठार झाल्याची घटना रविवारी ६ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.

सोनल रामगिरवार (२६,नागेपल्ली ता.अहेरी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुण अभियंत्यांचे नाव असून इतर दोन मजुरांची नावे मात्र कळू शकली नाही. सुरजागड पहाडीवर लॉयड मेटल्स कंपनीकडून लोह उत्खनन करण्याचे काम सुरू आहे. या पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणारे वाहन खाली कोसळले व खाली उभ्या असलेल्या जीपवर पडले. या अपघातात 

खाणीतील गंभीर जखमी झालेल्या एक अभियंता व दोन मजूर असे तिघांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर अहेरी उपजिल्हा रुग्णालयात एकच गर्दी झाली होती. या घटनेनंतर एटापल्ली येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

विशेष म्हणजे या घटनेत मयत झालेले अभियंता सोनल रामगिरवार यांचं वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता. 

घटनेची माहिती मिळताच दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तरुण अभियंत्यांसह इतर दोन मजुरांचा मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here