अलिबागची मनसे मराठीसाठी आक्रमक ,
गुजराती पाट्या हटवा अन्यथा काळे फासू
मनसे तालुका प्रमुख सिद्धू म्हात्रें च्या नेतृत्वात आंदोलन
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- अलिबाग मध्ये गुजराती पाट्यांकडे मनसेने मोर्चा वळवलाय. महाराष्ट्रात मराठी पाट्यांना दुय्यम स्थान देऊन काहीजण गुजराती पाट्या लावताना दिसतायेत. त्यामुळे अलिबागची मनसे सेना चांगलीच आक्रमक झाली आहे.महाराष्ट्रात मराठी पाट्याच लावाव्यात असा आग्रह करीत त्यांनी तात्काळ गुजराती पाट्या हटवा अन्यथा काळे फासू असा गर्भित इशारा दिलाय.यासाठी मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी 15 दिवसांची मुदत दिली आहे.अलिबाग तालुक्यातील कच्ची भवन येथे मनसेसैनिकांनी मराठीसाठी मनसे तालुका प्रमुख सिद्धू म्हात्रें च्या नेतृत्वात आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.मराठी भाषेला सन्मान हवाय , मराठी चा अपमान कदापी सहन केला जाणार नाही असा जबर इशारा यावेळी दिला आहे.
महाराष्ट्र मध्ये राहून मराठीचा अपमान करणाऱ्या व्यक्तींना कधीही माफ केले जाणार नाही.मराठी मध्ये सर्व पाट्या करणे आवश्यक आहे.अन्यथा आमच्या पद्धतीने आंदोलन केले जाईल.
सिद्धू म्हात्रे
मनसे अलिबाग तालुका प्रमुख