माहूर शहरातील मटका गुटखा जुगार व अवैध धंदे तत्काळ बंद करा

माहूर शहरातील मटका गुटखा जुगार व अवैध धंदे तत्काळ बंद करा

अवैध धंदे व मटका गुटखा जुगार ह्याना कधी आळा बसेल….?

माहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश कराड सर यांना निवेदन देण्यात आले आहे

आदित्य खंदारे
माहूर प्रतिनिधी
7350030243

माहूर शहरातील वार्ड क्र. ३ मध्ये व माहूर शहरात मटका व जुगार व इतर अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरु असून माहूर हे तीर्थक्षेत्र असलेले ठिकाण आहे. या ठिकाणी दररोज देशभरातून हजारो भाविक ये-जा करत असतात,
परंतु या ठिकाणी राजरोस पणे सुरु असलेल्या मटका, जुगार व इतर अवैध व्यवसायामुळे तीर्थक्षेत्राची सर्वदूर अपकीर्ती पसरत आहे. त्यामुळे सदर गंभीर बाबीला आळा घालणे आवश्यक आहे.
माहूर शहरातील वार्ड क्र. 03 सह शहरातील सर्वत्र सुरु असलेले मटका, जुगार व इतर अवैध व्यवसाय तात्काळ बंद करण्यात यावे ही विनंती.
पोलीस ठाणे आमंलदार पो.स्टे. माहूर यांना वार्ड क्रमांक 03 चे नगरसेविका सौ नंदा रमेश कांबळे यांनी केली आहे..