नदीच्या पाण्यात बुडून बालकाचा मृत्यु… सिंदेवाही तालुक्यातील दुर्दैवी घटना

नदीच्या पाण्यात बुडून बालकाचा मृत्यु…
सिंदेवाही तालुक्यातील दुर्दैवी घटना

जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही प्रतिनिधी
8806689909 

सिंदेवाही :-तालुक्यातील जवळच असलेले खातगाव येथील एक हृदय कारक घटना समोर आली आहे. लोकेश मोहन वरखडवार वय 12 वर्ष रा. खातगाव नदीच्या पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले. ही दुर्दैवी घटना बुधवार सकाळी आठ वाजता घडली असून घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

तालुक्यातील खातगाव गावापासून जवळचे नदीवर आपल्या आई सोबत कपडे धुण्यासाठी नदीवर बुधवार सकाळी आठ वाजता गेला होता. नदीवर कपडे धुताना थोडासा पाण्यात खेळत होता. मात्र काही क्षणातच तो खोल पाण्यात गेला आणि पाण्यात बुडू लागला . आईने आरडा ओरड करून धाव घेतली परंतु प्रयत्न करूनही लोकेशचा जीव वाचवता आला नाही.नदीचे पाण्यात बुडताना आपल्या लेकराचा मृत्यू डोळ्यासमोर बघितल्याने आईवर मानसिक आघात झालेला असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे . मृतक लोकेश सहावी इयत्तेत शिक्षण घेत होता. त्याचे वय बारा वर्षे होत या दुर्दैवी घटनेनंतर खातगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.