*सोयाबीन पिकांवर पान अळीचा प्रादुर्भाव शेतकरी हवालदिल*

52

 

वर्धा जिल्हात खरीप हंगाम जोरात असून सोयाबीन पिक अळी आणी रोगाच्या प्रादुर्भावाने ग्रहण लागल्याने शेतकरी वर्ग डोक्याला हात लावीत चिंताग्रस्त झाला आहे.

वर्धा/ हिंगणघाट :- कोरोना वायरसच्या महामारीने पहिलेस जनतेचे कमरडे मोडले आहे. त्यात आता शेतकरी सोयाबीनच्या पीकावर मोठया प्रमाणावर अळीच्या प्रादुर्भावाने हतबल झाला आहे.
वर्धा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकरी किडीच्या प्रादुर्भावाने हतबल झाला असून केंद्र व राज्य सरकारच्या टीमने त्वरित सर्वे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयाचीची आर्थिक मदत घोषित करण्यात यावी. तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात यावा या मागण्या घेऊन हिंगणघाट विधानसभेचे माजी आमदार प्रा. राजु तीमांडे यांनी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लक्षणीय उपोषण केल.
हिंगणघाट तालुक्यात खरीप हंगाम जोरात असून त्याला वेगवेगळ्या रोगाच्या प्रादुर्भावाने ग्रहण लागल्याने शेतकरी वर्ग डोक्याला हात लावीत आहे.
तसा शेतकरी वर्गाला अत्यंत खडतर प्रवास करून काळ्या आईला फुलवुन आपल्या पोटाचा प्रश्न सोडवतो. पण आज त्या शेतकरी वर्गाची हालत आज वाईट परिस्थितीतुन जात आहे. बळीराजांने खरीप हंगामासाठी चांगली कंबर कसली होती. त्यासाठी शेतकरी वर्गाने या हंगामात नगदी भांडवल देणारे पिक लागवडीसाठी पसंती दिली. त्यात सोयाबीन पिक घेण्यावर अधिक भर दिला. परंतु याही हंगामाने बळीराजांच्या समोरील समस्या कमी न करता त्या वाढल्याने शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे.
यंदा सोयाबीनच्या झाडाची वाढ मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे त्यांचा परिणाम उत्पन्न वाढीवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच सोयाबीन पिकाची पाने कुर्तडणारी आळी सोयाबीनची पाने खात असून ती पानाची पुर्ण चाळणी करीत आहे. यासाठी शेतकरी वर्गाला अत्यंत महागडे किंमतीचे औषधांची खरेदी करून त्याची वेळोवेळी फवारणीकरावी लागत आहे. एवढे भांडवल खर्च करून आपल्या हातात उत्पन्नाची भर जास्त कशी येईल. यासाठी शेतकरी वर्गाची धावपळ सुरू झाली आहे.
मागील हंगामात शेतकरी वर्ग वातावरणातील बदलावामुळे व अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करीत पिकाचा हंगाम घेतो. परंतु या विविध संकटामुळे प्रमाणापेक्षा जास्त भांडवल खर्च होऊन ही उत्पन्न काहीच मिळत नाही. सोयाबीन पिकांवर यंदा विविध संकटाचा विळखा पडल्यामुळे सोयाबीनवरील आशा मावळली जाण्याची भीती निर्माण झाली आहे.