माजी आमदार निमकरांवर आघाडी सरकारची माया भा. ज.पा ची छाया – सूरज ठाकरे जिल्हाध्यक्ष युवा स्वाभिमान पार्टी

19

माजी आमदार निमकरांवर आघाडी सरकारची माया भा. ज.पा ची छाया – सूरज ठाकरे जिल्हाध्यक्ष युवा स्वाभिमान पार्टी

भारतीय जनता पक्षाच्या निमकर यांनी केले आघाडी सरकार तर्फे केलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व

माजी आमदार निमकरांवर आघाडी सरकारची माया भा. ज.पा ची छाया - सूरज ठाकरे जिल्हाध्यक्ष युवा स्वाभिमान पार्टी
माजी आमदार निमकरांवर आघाडी सरकारची माया भा. ज.पा ची छाया – सूरज ठाकरे जिल्हाध्यक्ष युवा स्वाभिमान पार्टी

कोरपणा तालुका प्रतिनिधी निखिल पिदूरकर 9067769906

राजुरा:- एकाच विषयावर एकाच पक्षातील राजुरा विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व करू पाहणाऱ्या दोन नेत्यांमध्ये चढाओढ कार्यकर्त्यांन मध्ये व जनतेमध्ये द्विधा मनस्थिती भविष्यामध्ये नेतृत्व नेमके करणार कोण भारतीय जनता पक्षाला राजुरा विधानसभा क्षेत्रांमध्ये कधी नव्हे ते सुगीचे दिवस मोदी लाटेमुळे 2014 ला आमदाराच्या स्वरूपामध्ये मिळाले परंतु म्हणावे त्याप्रमाणे कार्य न केल्यामुळे 2019 च्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्ष थेट चौथ्या क्रमांकावर फेकला गेला पक्षाला नवी उभारणी व नवचैतन्य निर्माण करण्याकरिता नव्याने त्यांची व तरुण रक्ताची गरज आहे परंतु वरिष्ठ पक्ष नेतृत्व यांच्या हे अजूनही लक्षात आलेले नाही उलटे यांनी चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या पक्षांमध्ये दुपारी निर्माण करण्याकरिता चार पक्ष फिरले उरले असलेले माजी आमदार सुदर्शन निमकर यांना भारतीय जनता पक्षामध्ये सामावून घेतले व आता या दोघांमधील वाद परत एकदा गडचांदूर येथे रेल्वे विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांना एकाच पद्धतीच्या मागण्या करण्यात करतात वेगवेगळे दोन शिष्टमंडळ गेल्याने चव्हाट्यावर आला आहे यातील सुदर्शन निमकर यांनी तर कहरच केला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळाचे नेतृत्व सुदर्शन निमकर यांनी केले व काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या लेटरहेडवर असलेले निवेदने उच्च अधिकाऱ्याला स्वतःच्या हाताने दिलीत तथा त्या ठिकाणी गडचंदुर नगर परिषद चे उपस्थित उपाध्यक्ष यांना हे आमचे उपाध्यक्ष असे संबोधले हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून गडचांदूर चे उपाध्यक्ष शरद जोगी हे भारतीय जनता पक्षामध्ये गेले की भारतीय जनता पक्षाचे सुदर्शन निमकर हे परत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेले या चर्चेला उधाण आला आहे भारतीय जनता पक्षाची अशी परिस्थिती पाहता हळूहळू कार्यकर्ते देखील नाराजीचा सूर निर्माण होत असून काँग्रेस व इतर पक्षांकडे वळत आहेत वेळी जर भारतीय जनता पक्षाने राजुरा विधानसभा क्षेत्राचे नेमके नेतृत्व कोण करणार हे जाहीर केले नाही तर या दोन्ही नेतृत्वामध्ये दिसण्यापेक्षा तिसरा कुठलातरी मार्ग पर्याय म्हणून कार्यकर्ते स्वीकारतील यात काहीच वाद नाही.

भारतीय जनता पार्टी राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुदर्शन नीमकर अजूनही मनाने काँग्रेसचे आहेत त्यांचा राजुरा व चुणाल्याचा निवास स्थानी आजही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी सोबतचे व राजीव गांधी चे फोटो लागले आहेत, इस.१९९९ साली निमकर हे आमदार झाले होते तेव्हा त्यांना सिमेंट कंपनी कडून हिरव्या रंगाची बोलेरो भेट मिळाली होती तेव्हा त्या वाहनावर काँग्रेस पक्षाचे पंजा गाडीच्या मागे पुढे लावला होता त्या नंतर २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला २०१९ ला बिजेपी मध्ये प्रवेश घेतला पण आज पर्यंत काँग्रेस सोडल्या नंतर त्यांनी दोन्ही पक्षाचे चिन्ह स्वतःचा वाहनावर लागले नाही… असे बऱ्याच गोष्टी आहेत, ते  आज बिजेपी चा बॅनर वर दिसतात पण अजूनही त्यांचं मन बीजेपीमध्ये स्थिर झालेलं दिसत नाही आहे.. 

ते कधी काँग्रेस तर कधी शिवसेना तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस तर कधी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं मन संतुलन बरोबर आहे कि नाही मला याचाच विचार येत.. भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठीनी याचा विचार करावा कारण हा माणूस वेळेवर काय करेल याचा काही नेम नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी हा काहीपण कुठल्याही स्तरावर जाऊ शकतो.