भिमराव धुळप यांच्या वाढदिवसानिमित्त कराडमधील झोपडपट्टीतील मुलांना खाऊ वाटप

संजय पाटील, घोगाव तालुका कराड 9657070213
घोगाव, तालुका कराड:- घोगांव गावचे सुपुत्र शासनमान्य पत्रकार धगधगती मुंबई साप्ताहिकाचे संपादक भिमराव धुळप यांच्या वाढदिवसानिमित्त कराडत परिसरातील झोपडपट्टीमधील गरीब मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. गोरगरीब जनतेला मदत करण्याच्या हेतूने हा सामाजिक उपक्रम घोगांव गावचे पत्रकार संजू पाटील यांनी राबवला.
भीमराव धुळप हे नेहमीच आपल्या विविध सामाजिक कार्याने मोठ्या प्रमाणात लोकसेवा करत असतात .मुख्यमंत्री वैद्यकीय मदत निधी च्या माध्यमातून महाराष्ट्रातील हजारो रुग्ण गोरगरीब यांना असंख्य रोगांवर उपचारासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात मदत करून देत असतात. तसेच कराड दक्षिण मधील अनेक गोरगरीब लोकांच्या मुलांना त्यांनी मुंबईमध्ये जेवण , राहण्याची सोय करून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे.मोठ्या उत्साहाने पाच सप्टेंबर 2021 रोजी त्यांचा जन्म दिवस वीविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला .गावातील विविध सामाजिक संघटना ,गणेश मंडळ यांच्यातर्फे कोरोना रुग्णांना फळ वाटप तसेच सर्व ग्रामस्थांना मास्क वाटप त्याचबरोबर एक कुटुंब एक सँनिटायझर बाँटल या माध्यमातून घोगाव ग्रामस्थांना कोरोनाच्या लढाईसाठी सैनी टायझर वाटप करण्यात आले
संजय पाटील ,घोगांवभूषण,माहिती अधिकारी कार्यकर्ता , पत्रकार .घोगाव .तालुका कराड 9657070213