खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध कर’, वडेट्टीवारांचा पडळकरांना इशारा

52

खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध कर’, वडेट्टीवारांचा पडळकरांना इशारा

खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध कर’, वडेट्टीवारांचा पडळकरांना इशारा
खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध कर’, वडेट्टीवारांचा पडळकरांना इशारा

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
Mo 9096817953

नागपूर :- राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची छत्तीसगढ येथे फॅक्टरी असल्याचे वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. पडळकरांच्या या वक्तव्याचा वडेट्टीवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. खऱ्या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध कर. नाही तर आज तुला नोटीस देणार आहेच. हे माझं ठरेललं आहे, असा थेट इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, पडळकरांनी ऐकिव गोष्टीवर आरोप करू नये. वास्तव गोष्टींवर आरोप करावेत. आता ते कार्यकर्ते राहिले नाहीत. आमदार झाले आहेत. एखाद्या मंत्र्यावर जबाबदारीने आरोप केले पाहिजेत. माझी छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. कोणत्या ठिकाणी ही फॅक्ट्री आहे हे त्यांनी सांगावं. पत्ता काढावा. कोणत्या नातेवाईकाची आहे हे सांगावं. नाही सांगितलं तर मी अब्रुनुकसानीचा दावा करेन. कोर्टात जाईल. माझी कोणत्याही दुकानात भागिदारी नाही. असेल तर पडळकरांनी ती पुराव्यानिशी सिद्ध करावी, असं वडेट्टीवार म्हणाले.

वडेट्टीवार यांनी पडळकरांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. वडेट्टीवार पुढे म्हणाले कि, माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करावे, पुरावे द्यावे, आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेल. माझ्या नावाने, माझ्या नातेवाईकांच्या नावे कुठलंही दारुचे दुकानं नाही. छत्तीसगडमध्ये कंपनी नाही. पडळकर खऱ्या बापाची औलाद असेल तर, तर त्यांनी आरोप सिद्ध करावे, असा इशाराच वडेट्टीवार यांनी दिल आहे.

ओबीसी चळवळीला बदनाम करण्याचं काम पडळकर करतात. सुपारी घेऊन चळवळ संपवण्याचं काम ते करत आहेत. पडळकर खरंच ओबीसींसाठी काम करणार असेल तर त्यांनी सोबत यावं, असा सल्ला वडेट्टीवार यांनी दिला आहे. तसेच त्यांनी एका विधानाची आठवण करून दिली भाजपमध्ये जाणार नाही असं कुलदैवताची शपथ घेऊन पडळकर भर सभेत बोलले होते. त्याचं काय झालं?, असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केले.