कान्होली बारा गावात शेतकऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने भरवला पोळा

✒ देवेंद्र सिरसाट ✒
हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
📲 9822917104 📲
नागपूर/हिंगणा:- शेतकऱ्यांचा जीवाभावाचा सखा त्याचा सर्जा राजाचा सन म्हणजेच पोळा, परंतु शासनाचे निर्बंध असतांना पोळा भरतो की नाही अशी परिस्थिती असतांना कान्होली बारा गावात शेतकऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने पोळा भरवला.कान्होलीबारा आणि आजुबाजुच्या परिसरात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते तसा हा भाग सुखी संपन्न आहे त्यामुळे गोधन सुध्दा मोठ्या प्रमाणात आहे.शेती तेथे बैल हे समीकरण आलंच, बार महिण्यातून एकदा येणारा पोळा सण साजरा करण्याची शेतकरी आतुरतेने वाट बघत असतो, पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना झांज, घंटा घुंगर वाजवून पोळा सणाचे आमंत्रण दिल्या जाते, बैलांना आंघोळ घातल्या जाते शिंगांना रंगवल्या जाते, अंगावर रंगीबेरंगी झुल टाकून शिंगाजवळ समोर बाशिंग बांधून गावातील मुख्य वेशीजवळ गावातील सर्व बैल गोळा केल्या जातात तेथे शेतकरी आनंद उत्सव साजरा करत झडत्या म्हणतात (मनोरंजनात्मक गितं) नंतर पोळा फुटतो गावातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाते महिला आरती ओवाळून गोडधोड पुरणपोळी इतर पदार्थ खायला देतात, या निमित्ताने शेतकरी आपल्या सोबत बाराही महिने राबणाऱ्या बैलाच काही अंशी ऋण फेडल्याच समाधान मानतो आणि पुन्हा नव्या दमाने शेतीच्या मशागतीसाठी सर्जाराजा सह वाहुन घेतो असा हा पोळा सण निर्बंध असतांही कान्होलीबारा येथिल शेतकऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने साजरा केला.