विजेच्या धक्क्याने वानराचा मृत्यू

52

विजेच्या धक्क्याने वानराचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने वानराचा मृत्यू
विजेच्या धक्क्याने वानराचा मृत्यू

 

मिडीया वार्ता न्यूज                                                                  जळगाव जिल्हा प्रतिनिधी                                                             विशाल सुरवाडे 

जळगाव– भडगाव तालुका येथील कजगाव येथे सकाळी अकरा वाजता विजेच्या धक्क्याने मृत्यू झाले त्यामुळे जुनेगावातील शनी महाराज मंदिराजवळील बोलीपद्धतीने साजरा होणारा बैल पोळा रद्द करण्यात आला होता मृत्युमुखी पडलेल्या वानरावर हिंदू रीतिरिवाजप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले नेहमी एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणाऱ्या कजगाव ग्रामस्थांनी आज हनुमान रुपी वानराची सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली व तितुर नदी काठावरील स्मशानभूमी जवळ अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी संजय पाटील अरुण पाटील लालसिंग पाटील गोरख पाटील सुभाष पाटील रविंद्र पाटील भावडू पाटील बाळू पाटील राजेंद्र पाटील निलेश पाटील जयपाल पाटील रोहित पाटील व असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी कजगाव ग्रामस्थांनी तीन दिवसांचे सुतक पाळले आहे व वानराचे उत्तरकार्य दिनांक ८ रोजी लोकसहभागातून होणार आहे

“”:आणि वांनरांची माया दिसून आली

दरम्यान विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्या वानराला पाहून येथील काही वानरे त्याच्या आजूबाजूला जमा झाले व त्यांनी कुत्र्यापासून संरक्षण व्हावे म्हणून थेट इमारतीच्या तिसरा मजल्यावर नेले वनराला वांनरांनी आपल्या कवेत सुरक्षित घेऊन गेलेले पाहून यावेळी ग्रामस्थांचे लक्ष गेल्यावर त्यांनी वानराचे शव ताब्यात घेऊन त्याला सजवून वानरावर विधीवत अंत्यसंस्कार केले वांनरांची वांनरांप्रति असलेली माया दिसून आली त्यावेळी ग्रामस्थही भावुक झाले होते