कुणी तरी असावं….!

63

कुणी तरी असावं….!

कुणी तरी असावं....!
                                                                                                     कुणी तरी असावं….!

जीवनाच्या वाटेवर पाऊल टाकताना
हातात हात धरून चालणारं
कुणी तरी असावं…

स्वप्नांच्या खोल गर्तेत असताना
वास्तव्याची जाणीव करून देणारं
कुणी तरी असावं…

रखरखत्या उन्हात घाम गाळताना
सावलीच्या सरीनं स्नान घालणारं
कुणी तरी असावं…

भुकेनं व्याकूळ होत असताना
स्वत:च्या हातानं घास भरवणारं
कुणी तरी असावं…

दु:खी मन झोपत नसताना
अंगाई गीत गाऊन कुशीत निजवणारं
कुणी तरी असावं…

डोळ्यातून गंगाश्रू वाहताना
आपल्या पदरानं पुसणारं
कुणी तरी असावं…

अंत:करणातील रक्ताळलेल्या जखमांना
प्रेमाच्या धाग्याने शिवणारं
कुणी तरी असावं…

कवि शब्दस्पर्शी – सुनील शिरपुरे
कमळवेल्ली, यवतमाळ
भ्रमणध्वनी-7057185479