स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथे शिक्षक दिन सोहळा मान्यवरांच्या तथ शिक्षकांच्या सत्कारींनी थाटात संपन्न
शाळा व्यवस्थापन समिती आणि समस्त ग्रामवासी, मंगी (बु) कडून मान्यवरांचा नागरी सत्कार : राजुराचे गटविकास अधिकारी डॉ. ओमप्रसाद रामावत आणि जि.प. सदस्य तथा शिक्षण व क्रीडा समिती सदस्य मेघाताई दिलीपराव नलगे यांचा शाल, श्रीफळ आणि मोमेंटो भेट देवून नागरी सत्कार करण्यात आला.
शिक्षकांचा नागरी सत्कार : श्रीनिवास गोरे आणि पंडीत पोटावी यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
शिक्षणप्रेमीचा नागरी सत्कार: शिक्षणप्रेमी कु. शैलाताई जयपाल मडावी यांचा शिक्षण विभाग, पंचायत समिती कडून प्रमाणपत्र आणि ग्रामवसीयांकडून शाल व श्रीफळ देवून भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

✍️संतोष मेश्राम✍️
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
राजुरा:- सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे राजुरा तालुक्यातील स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही दिनांक 5 सप्टेंबर 2021 ला शिक्षक दिन कार्यक्रम मोठया उत्सहात व आनंदात साजरा करण्यात आला. सर्व प्रथम भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमेचे पुजन करुन पुष्पमाला अर्पण करण्यात आली. त्यानंतर सर्व मान्यवरांना स्थानापन्न करुन मान्यवरांचे पुष्पगुच्छाने स्वागत करण्यात आले. मान्यवरांचे व शिक्षकांचे तथा शिक्षणप्रेमीचे शाल व श्रीफळ देवून नागरी सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजुराचे गटविकास अधिकारी डॉ. ओमप्रसाद रामावत हे होते तर विशेष अतिथी म्हणून जि.प. सदस्य तथा शिक्षण व क्रीडा समिती सदस्य मेघाताई दिलीपराव नलगे, गटशिक्षणाधिकारी विजय परचाके, अंबुजा सिमेंट फाउडेशनचे कार्यक्रम व्यवस्थापक श्रीकांत कुंभारे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीराम मेश्राम, केंद्रप्रमुख शेषराव वानखेडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंबादास जाधव, ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परशुराम तोडासाम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रकाश वेडमे, पेसा समितीचे अध्यक्ष संगीता कोडापे, पोलीस पाटील व्यंकटराव मुंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुमनताई येमुलवार, माजी जि.प. सदस्य भिमरावजी पुसाम, माजी उपसरपंच वासुदेव चापले, ग्रामसेवक गजानन वंजारे, गावातील ज्येष्ठ नागरीक संभाजी पा. लांडे, सदस्य शंकर तोडासे, मुख्याध्यापक रत्नाकर भेंडे, अंबुजा फाउन्डेशनचे शिक्षण मार्गदर्शक किशोर हजारे, शशिकांत धनवलकर यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमानंतर मान्यवरांनी मंगी (बु) स्मार्ट गावाची पाहाणी केली. गावातील सुंदर रस्ते, स्वच्छता, शोषखडडे, वृक्षसंवर्धन, मनमोहक बगीचा या वातावरणांनी भारावून गेले. शहराला लाजवेल असे कार्य ग्रामवासीयांनी केलेले आहे. गावानी स्वच्छतेचा ध्यास घेवून गाव सुंदर केलेला आहे यामध्ये गावाचं श्रम आहे ती टिकवून ठेवण्याची जबाबदारी सुध्दा ग्रामवासीयांची आहे असे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमामुळे गावात एक आनंददायी सोहळयाचे रुप आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे सुंदर व प्रभावी सुत्रसंचलन गट साधन केंद्राचे विषय तज्ज्ञ मुसा चांदसाहाब शेख यांनी केले तर आभार मंगी (खु) मुख्याध्यापक परशुराम तोडासाम यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी ज्येष्ठशिक्षक श्रीनिवास गोरे, पंडीत पोटावी, अंगणवाडी सेविका शारदाताई क्षिरसागर, भिमबाई कन्नाके, शिक्षणप्रेमी शैलाताई जयपाल मडावी तथा पालक कपिल गाडगे, नवनाथ जाधव, रमेश कोडापे, संतोष रोहणे, धर्मा पुसाम, मधुकर चव्हाण, दशरथ जाधव, विजय कुळसंगे, इंद्रपाल चव्हाण, शामराव कन्नाके, रामचंद्र धुर्वे, सुरेश सिडाम, सीमा कन्नाके, शितल सोयाम, अनिता कोडापे, तानेबाई आडे, कौशल्याबाई आत्राम, जंगुबाई गेडाम, राजु मोहितकर, ग्रा.पं. कर्मचारी चरणदास चिलकुलवार, नितीन मरस्कोल्हे, रोजगारसेवक दिनेश राठोड डाटाएन्टी ऑपरेटर बालाजी मुंडे तथा आशा वर्कर मंदाताई मत्ते, युवक नागेश चापले, पंकज वेडमे, विक्की हनुमंते, पंकज मरस्कोल्हे, ज्ञानेश्वर चापले, सुमित चिलकुलवार, मारोती चापले, अशोक क्षिरसागर, अनुसयाबाई कुळसंगे, फुलाबाई सिडाम यांनी मोलाचे सहकार्य केले.