नागपूरमध्ये आली कोरोनाची तिसरी लाट, नवीन नियमावली जाहीर

59

नागपूरमध्ये आली कोरोनाची तिसरी लाट, नवीन नियमावली जाहीर

नागपूरमध्ये आली कोरोनाची तिसरी लाट, नवीन नियमावली जाहीर
नागपूरमध्ये आली कोरोनाची तिसरी लाट, नवीन नियमावली जाहीर

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
Mo 9096817953

नागपूर:- कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा सुरू करण्यात आला आहे. पण, आता ज्याची भिती व्यक्त केली जात होती, ती कोरोनाची तिसरी लाट नागपूरमध्ये पाऊल टाकले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे नागपूरमध्ये पुन्हा विकेंड लॉकडाऊन
लावण्यात येणार आहे.

नागपूरमध्ये पुन्हा तीन दिवसानंतर निर्बंध कडक करण्यात येणार आहे. नवीन निर्बंधानुसार, रेस्त्रारंट हे 8 वाजेपर्यंत सुरू असेल तर दुकानं 4 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. सोबतच परत एकदा विकेंडला बाजरापेठेसाठी लॉकडाऊन सुरू करण्यात येणार आहे. सर्व संघटना सोबत चर्चा करून तीन दिवसांनंतर हे नियम लागू करण्यात येणार आहे.

कोरोना संदर्भात जे आकडे समोर येत आहेत ते पाहता पुन्हा कडक निर्बंध लावण्याची गरज निर्माण झाली आहे. तिसऱ्या लाटेने नागपूर जिल्ह्यात पाऊल टाकले आहे. 78 बाधितांचे सॅम्पल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले आहे, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली.