उमरखेड तालुक्यातील आरोग्य केंद्राला दोन डॉक्टर प्राप्त होताच नागरिकांनी मानले मनसे पदाधिकाऱ्याचे आभार

50

उमरखेड तालुक्यातील आरोग्य केंद्राला दोन डॉक्टर प्राप्त होताच नागरिकांनी मानले मनसे पदाधिकाऱ्याचे आभार

उमरखेड तालुक्यातील आरोग्य केंद्राला दोन डॉक्टर प्राप्त होताच नागरिकांनी मानले मनसे पदाधिकाऱ्याचे आभार
उमरखेड तालुक्यातील आरोग्य केंद्राला दोन डॉक्टर प्राप्त होताच नागरिकांनी मानले मनसे पदाधिकाऱ्याचे आभार

साहिल महाजन यवतमाळ प्रतिनिधी
9309747836
यवतमाळ:- उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न घेऊन मनसे मागील एक महिन्या पासून पाठपुरावा करत आहे. आज आरोग्य केंद्राला कुलूप ठोको आंदोलन असल्याने आरोग्य केंद्राच्या जाचाला कंटाळलेले नागरिक आंदोलनात सामील झाले होते. आरोग्य केंद्राकडून नागरिकांची होणारी हेळसांड थाबण्या करीता मनसे आंदोलनाचा इशारा दिला होता त्या मध्ये खालील मागण्या मनसेच्या वतीने केल्या होत्या करोडो रुपये खर्च करू नवीन सुसज इमारत उभी करण्यात आली परंतु आत्यावश्यक असलेल्या सोयीसुविधा कुठेही दिसत नाही मागील सहा वर्षांपासून गरोदर महिलांना असणाऱ्या प्रसूती होताना दिसत नाही, गरोदर मातांचे प्रसूती बंद आसल्यामूळे खूप मोठ्या आशा घेऊन आरोग्य केंद्रात आलेल्या महिलांना प्रसूती करीता खाजगी दवाखाना गाठावा लागत आहे. आरोग्य केंद्रात दोन एम.बी.बी.एस यांची नियुक्ती असताना गोरं गरीब रुग्णाला आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्याच प्रमाणे महिलांना कुटुंब नियोजन शत्रक्रिया करण्या करीता विडुल प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागते किंवा तालुक्यातील उमरखेड कुटीर रुग्णालयात जावे लागत आहे. कधी काळी यवतमाळ आरोग्य केंद्रात औषधी वितर्क भुसाळे तीन वर्ष सेवा निवृत्त झाल्या पासून आरोग्य केंद्रात औषध वितर्क यांची नियुक्ती करण्यात आली नाही. आरोग्य केंद्रात एक हि नर्स नाही उपकेंद्रा अंतर्गत असलेल्या नर्स यांच्या मार्फत आरोग्य केंद्रात सुविधा पुरवल्या जात आहेत. त्यामुळे आरोग्य केंद्रात रिक्त असलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी तसेच डॉ. सदाशिव धनवे यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागी त्वरित डॉ. ची नियुक्ती करावी आरोग्य केंद्रातील दुसरे डॉ. गोविंद जाधव यांची बदली नांदेड येथे झाल्याने त्यांना रिलीव्ह करण्या आधी दुसऱ्या डॉक्टरची नियुक्ती करावी यासह इतर मागण्या करीता जिल्हा प्रशासनाला वेळो वेळी निवेदन दिले मात्र त्याकडे कानाडोळा केल्या जात असल्याने अखेर 7 सप्टेंबर रोजी आरोग्य केंद्राला कुलूप ठोको आंदोलन मनसे जिल्हा अध्यक्ष देवा भाऊ शिवरामवार मनविसे जिल्हा अध्यक्ष अनिल हमदापुरे जिल्हा उपाध्यक्ष डेव्हिड शहाणे मनसे तालुका आध्येक्ष सादिक भाई यांच्या नेतृत्वात आरोग्य केंद्रा वर धडक दिली आसता पोलीस प्रशासनाने मध्यस्ती करत मनसे च्या मागण्या पैकी मुख्य मागणी तालुका वैधकीय अधिकारी मुनेश्वर यांनी त्वरित मंजूर करत ढाणकी आरोग्य केंद्रात दोन डॉक्टर यांची नियुक्ती केली डॉ गोविंद जाधव याना रिलिव्हर येणार नाही तो प्रयन्त आरोग्य केंद्रातून सोडण्यात येणार नाही यासह इतर मागण्या आठ दिवसात पूर्ण करण्यात येतील तसेच महिलांना प्रसूती करीता स्वतंत्र विभाग चालू करण्यात येईल असे लेखी लिहून दिले यावेळी दत्त पिलवड हिरासिंग चव्हाण मुकुंद जोशी ढाणकी शहर अध्यक्ष तोसीफ आर्णी शहर अध्यक्ष कपिल ठाकरे प्रवीण भिमटे क्रुष्णा हिंगमिरे वसंता नरवाडे आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडूनये या करीता ठाणेदार प्रताप भोस यांनी पोलीस बंदोबस्त लावला होता आंदोलन कर्त्यांना. स्थान बद्ध करून सोडून देण्यात आले मनसेचं कुलूप ठोको आंदोलनाला सहकार्य करण्या करीता मोठ्या प्रमाणात नागरिक जमले होते