संतोष ताटीकोंडावार यांच्या प्रयत्नाने कमलापूर हत्तीकॅम्प टाकणार कात! प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या भेटीने वनविभाग ऍक्टिव्ह मोडवर

50

संतोष ताटीकोंडावार यांच्या प्रयत्नाने कमलापूर हत्तीकॅम्प टाकणार कात! प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या भेटीने वनविभाग ऍक्टिव्ह मोडवर

संतोष ताटीकोंडावार यांच्या प्रयत्नाने कमलापूर हत्तीकॅम्प टाकणार कात! प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या भेटीने वनविभाग ऍक्टिव्ह मोडवर
संतोष ताटीकोंडावार यांच्या प्रयत्नाने कमलापूर हत्तीकॅम्प टाकणार कात! प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या भेटीने वनविभाग ऍक्टिव्ह मोडवर

संतोष सल्लावार
अहेरी शहर प्रतिनिधी 8390031122

अहेरी :- राज्यातील एकमेव कमलापूर शासकीय हत्ती कॅम्प मागील काही काळात झालेल्या तीन हत्तींच्या मृत्यूमुळे विशेष चर्चेस आले होते. यासोबत नियमित व प्रशिक्षित कर्मचा-यांची कमतरता तसेच स्थायी पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने सदर हत्तीकॅम्प प्रशासकीय अनास्थेचा बळी तर पडणार नाही ना? असा प्रश्न वन्यप्रेमींकडून उपस्थित केला जात होता. याच दरम्यान प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी सदर हत्ती कॅम्पला भेट देत येथील स्थितीचा आढावा घेतल्याने वनविभाग अॅक्टिव्ह मोडवर आल्याचे दिसून येत आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या या भेटीने कमलापूर येथील हत्तीकॅम्प नव्याने कात टाकण्याची चिन्हे बळावली आहेत.

अहेरी तालुक्यातील सिरोंचा वनविभागांतर्गत येणा-या कमलापूर वनपरिक्षेत्रातील या हत्तीकॅम्पमये मागील ऑगस्ट महिन्यात ‘सई’ व ‘अर्जून’ नामक दोन हत्तींच्या पिल्लांचा मृत्यू ओढावला होता. तर 2020 मध्ये आदित्य चा मृत्यू झाला होता. या घटनेने हत्तीकॅम्प देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. सद्यस्थितीत 7 हत्ती शिल्लक आहेत. त्यामुळे हत्तीकॅम्प येथील हत्ती टिकविण्याकरीता वनविभागातर्फे कायम उपाययोजना करण्यात येईल, याकडे जिल्हावासीयांसह वन्यजीव प्रेमींचे लक्ष लागले आहे. तसेच कमलापूर वनपरिक्षेत्राअंतर्गत क्षेत्रात कोलामार्का अभयारण्यात मोठ्या प्रमाणात जंगलतोडीसह वनखनिजाच्या उत्खननाचे प्रमाण वाढल्याने वनसंपतीचेही अतोनात नुकसान होत आहे. यामुळे वरिष्ठ वनाधिका-यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत होती. याच दरम्यान काल 5 सप्टेंबर रोजी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी भेट घेतली.

हत्तीकॅम्प येथील परिस्थितीचा घेतला आढावा
या भेटीदरम्यान प्रधान मुख्य वनंसरक्षकांनी हत्तीकॅम्प येथील एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. यादरम्यान कमलापूर येथील हत्तींची माहिती घेऊन येथे कार्यरत माहूत व चारा कटर यांच्यासोबतच प्रत्यक्ष चर्चा करीत कॅम्पमध्ये घडलेल्या घटनांची माहिती जाणून घेतली. उर्वरीत हत्तींवरील उपचारांसदर्भात अधिकृत माहिती जाणून घेत पुढील नियोजनाबाबत चर्चा केली. तसेच येथील हत्तीकॅम्प कुठेही हलविण्यात येणार नसल्याचे सुतोवाच करीत कॅम्प परिसर अधिक सुंदर करुन हत्तींची योग्य देखरेख कशी करता येईल, याबाबत अधिका-यांना सूचना केल्या. वरिष्ठ वनाधिका-यांच्या या प्रत्यक्ष भेटीने स्थानिक वनविभाग ऍक्टिव्ह मोडवर आले असून राज्यातील पर्यटकांना भूरळ घालणारे सदर हत्तीकॅम्प पुन्हा नव्याने आपले वैभव प्राप्त करेल, अशी अपेक्षा जिल्हावासियांकडून होत आहे.

माहूतांना प्रशिक्षणांसाठी कर्नाटकातून प्रशिक्षक आणणार
हत्तीकॅम्प परिसरापासून अनेक किमी दूर जाऊन हत्तींना चारा खावा लागत आहे. या परिसरात तलाव असून पाण्याची सुविधा असल्याने या ठिकाणी बांबू लागवड करुन हत्तींसाठी योग्य चारा तयार करण्याचे नियोजन आहे. हत्ती निरोगी ठेवण्यासाठी प्रामुख्याने प्राधान्य देण्यात येणार आहे. कॅम्पमधील हत्तींची देखरेख करणा-या माहूतांना योग्य प्रशिक्षण देण्यासाठी कर्नाटक राज्यातून प्रशिक्षक आणून या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सुनील लिमये प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

वरिष्ठ वनाधिका-यांचा सकारात्मक प्रतिसाद
प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी सकारात्मक वृत्ती बाळगून माझ्याशी 15 मिनीटे चर्चा केली. या चर्चेदरम्यान हत्तींच्या आरोग्य विषयक देखभालीसाठी स्थायी पशुवैद्यकीय अधिकारीची नियुक्ती करणे, प्रशिक्षित महावतांची नेमणूक, रिक्त पदे यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. पर्यटनाला वाव देण्यासाठी स्थानिक स्तरावर कमिटी स्थापन करण्याचे सुतोवाच त्यांनी केले. रिक्त पदे भरताना स्थानिक कार्यरत वनमजूरांना प्राधान्य देण्याची विनंती केली. प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी मागण्यांचा चर्चेला उत्स्फर्त प्रतिसाद देत समस्या लवकरच निकाली काढण्याची ग्वाही दिली.