रायगड जिल्ह्यात दोन लाख मतदार जोडले गेले आधारशी…
मात्र चणेरा विभाग वंचित,
कोणतेही स्टॉल व शिबिरे नाहीत…
शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो.7972420502
दि:06/09/2022
रोहा:मतदार यादी अपडेट व अचुक आसावी,या करिता भारत निवडणूक आयोगाने मतदार यादी आधारकार्डशी जोडण्या चा उपक्रम हाती घेतला आसुन त्यानुसार दि:01 ऑगस्ट 2022 पासुन मतदार यादी आधारकार्डशी जोडण्या चा कार्यक्रम सुरू झाला आहे.
या महिन्यात जिल्ह्यातील १ लाख ९३ हजार ३०४ मतदार आधारकार्डशी जोडण्यात आले नाही. त्यानुसार १८८ पनवेल-२४ हजार १०६•१८९कर्जत -२३ हजार ७७४•१९२अलीबाग -६ हजार ४६५•१९३ श्रीवर्धन-४७ हजार ४७७•१९४ महाड-३४ हजार ६०९ आशा एकुण १ लाख ९३ हजार ३०४ मतदारांनी आज रोजी पर्यंत अपले मतदार ओळखपत्र आधारकार्ड सोबत लिंक केले आहे. जिल्ह्यातील एकुण मतदारांची संख्या २२ लाख ७० हजार ७६८ इतकी आहे.
निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासन जास्तीत जास्त मतदार ओळखपत्र आधारकार्ड आधार लिंक करण्यावर भर देत आसुन या साठी जिल्ह्यत जागोजागी स्टॉल करण्यात आले आहे. या सोबत काही विशेष शिबिरे सुध्दा आयोजित करण्यात येत आसुन या मधे आधार नोंदणी साठी मतदारांकडून आर्ज क्रमांक ६ ब भरुन घेतले जात आहे. तरी जिल्ह्यातील सर्व मतदारांनी जास्तीत जास्तत संखेने अपले मतदार ओळखपत्र आधारकार्ड सोबत लिंक करावे.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर व उप जिल्हाधिकारी यांनी केले. तरी रोहा तालुक्यातील चणेरा विभागातील गावे व डोंगराळ भागात अनेक वाड्या आसुन कोणतीही शिबिरे व स्टॉल नसुन प्रत्येक मतदार केंद्रावर आधारकार्ड लिंक चे उपक्रम राबविण्यात यावी आशी मागणी होत आहे.