चाकरमान्याकडून माणगांव रेल्वे स्थानकात रेल रोको पोलिसांच्या मदतीने अखेर रेल्वे सोडण्यात आली
✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
मो.8080092301
माणगांव :-माणगांव रेल्वे स्थानकात दि.६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वा. च्या सुमारास परतीच्या प्रवासासाठी चाकरमानी निघाले असता जबलपूर एक्सप्रेस रेल्वे रुळावर उतरून रेल्वे रोको केला.माणगांव रेल्वे स्थानकात वापी गाडी थांबली परंतु रेल्वे मधील प्रवाशांनी दरवाजे उघडले नाहीत त्यामुळे सुरत वापी रिझव्हेशन तिकीट असलेल्या प्रवाशांना या रेल्वे मध्ये चढता आले नाही. त्याचा राग धरून संतापलेले परतीच्या प्रवाशांनी उभ्या असलेल्या जबलपूर एक्सप्रेस समोर उभे राहुन रेल रोको केला.
याची माहिती मिळताच माणगांव उपविभागीय अधिकारी पोलीस प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, स पो नि लहागे, पो स ई गायकवाड पो उ नि अनंत पवार, पो शि शाम शिंदे, रामनाथ डोईपोडे सचिन सोनकांबळे आपल्या टीमसह माणगांव रेल्वे स्थानकात तातडीने हजर झाले. अखेर पोलिसांच्या साहाय्याने स्टेशनं मास्तर सोबत बोलून प्रवासाच्या पुढील प्रवासाची व्यवस्था करण्यात आली येणारी ६.२५ मिनिटाची गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस मध्ये रिझव्हेशन केलेल्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आली.