ग्राम पंचायत चुटूगुंटा येथे ग्राम सभा संपन्न

54

ग्राम पंचायत चुटूगुंटा येथे ग्राम सभा संपन्न

ग्राम पंचायत चुटूगुंटा येथे ग्राम सभा संपन्न

ता.प्रतिनिधी मुलचेरा / महेश बुरमवार
मो.न. 9579059379

आज दिनांक 07/09/2022 रोज मौजा चुटुगूंटा येथे ग्राम पंचायत ची ग्राम सभा आयोजित करण्यात आला..सदर ग्राम सभेत बहुसंख्य नागरिक उपस्थित होते, सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.प्रधानमंत्री आवास योजना ड यादी त सुटलेले नाव समाविष्ट करणे , ग्राम पंचायत च्या विकासाच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.ग
ग्राम पंचायत च्या गावातील शेवटच्या नागरीकापर्यंत शासनाच्या योजना पोहचले पाहिजे यावर ग्राम सेवकांनी योग्य मार्गदर्शन केले. त्यातला एक विषय तंटामुक्त समिती चे निवड करणे..या विषयावर बरेच वेळ चर्चा करण्यात आली… चर्चेअंती श्री.व्यंकटेश भाऊ धानोरकर यांची तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणुन सर्वानुमते निवड करण्यात आली… गट ग्राम पंचायत अंतर्गत सर्व गावातील नागरिकांनी नवनियुक्त अध्यक्षाचे स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या…सदर ग्राम सभेला गट ग्राम पंचायत असलेल्या चुटुगूंटा ग्राम पंचायत चे गावातील बहुसंख्य लोक उपस्थित होते.. अशाप्रकारे ग्राम सभा पार पडली..