जनतेच्या समस्या: कुर्ला पश्चिम हॉलीक्रॉस चर्च जवळ चालतोय उघड्यावर मटका आणि जुगाराचा अड्डा, स्थानिकांची तक्रार

51

जनतेच्या समस्या: कुर्ला पश्चिम हॉलीक्रॉस चर्च जवळ चालतोय उघड्यावर मटका आणि जुगाराचा अड्डा

मीडियावार्ता
मुंबई, ७ सप्टेंबर: मटका किंग जगदीश गवणकर याच्याकडून सिटी किनारा होटल, प्रीमियर रोड, हॉलीक्रॉस चर्च जवळ, ओल्ड गावठान कुर्ला (प) खुलेआम मटका आणि जुगार चालवला जात असून, यांमुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

हा परिसर विनोबा भावे पोलीस स्थानकांतर्गत येत असून नागरिकांनी वारोंवार तक्रार करून सुद्धा मटका आणि जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. तरी संबधित पोलीस विभागाने या विरुद्ध लवकरात लवकर कारवाई करावी अशी स्थानिक नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे.

हॉलीक्रॉस चर्च सारख्या धार्मिक स्थळी, मुख्य रस्त्याला लागूनच चालत असलेल्या या मटका आणि जुगाराच्या अड्ड्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये जुगाराची वाईट सवयी लागण्याचा तसेच परिसरातील तरुण मुलांवर वाईट परिणाम होण्याचा धोका आहे.