शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने अहेरी जनसंपर्क जिल्हा कार्यालय येथे माॅ साहेब मीनाताई ठाकरे यांचा स्मृतीदिन साजरा

मारोती काबंऴे

गडचीरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

मों.नं.9405720593

अहेरी: गडचिरोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख मा.श्री महेश जी केदारी साहेब यांचे पूर्व आदेशाने व श्री शिवाजीराव खोडदे पाटील अहेरी विधानसभा संपर्कप्रमुख यांच्या सहकार्याने तसेच शिवसेना (उ.बा.ठा.) जिल्हाप्रमुख श्री रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आज ६ सप्टेंबर तमाम शिवसैनिकांवर सख्या आईप्रमाणे प्रेम करणाऱ्या वात्सल्यमूर्ती स्वर्गीय माॅसाहेब मीनाताई ठाकरे यांचा स्मृतीदिन अहेरी जनसंपर्क जिल्हा कार्यालय येथे शिवसैनिकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला सर्व प्रथम मां साहेब मीनाताई ठाकरे यांचे प्रतिमेला हार घालून नमन करण्यात आले या नंतर मां साहेब मीनाताई ठाकरे यांच्या आठावनीला उजाळा देण्यात आला.

मीनाताई बाळा साहेबांच्या व शिवसेनेच्या घडामोडी च्या सुख दुःखात नेहमी सहभागी असतं आमच्या सारख्या शिवसैनिकाच्या पाठीशी नेहमी असतं व आधार देत. .मां साहेब मीनाताई ठाकरे अमर.रहे.. च्या घोषणा देण्यात आले. महेश मोहुर्ले युवासेना तालुकाप्रमुख अहेरी, मनीष दुर्गे शिवसेना तालुकाप्रमुख एटापल्ली, अक्षय पुंगाटी युवासेना तालुकाप्रमुख एटापल्ली, नामदेव हीचामी नगरसेवक एटापल्ली, प्रमोद जी देवतळे तालुका संघटक, आयान पठाण युवासेना शहर प्रमुख अहेरी, नरेश दुर्वा शाखाप्रमुख, अंकित दूर्वा उपशाखाप्रमुख, विक्रम गुरनुले, अविनाश गुरनुले, वीरू कावळे, बाबू शेख, सावन मडावी बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here