११ ते १३ ऑक्टोंबरच्या दरम्यान विदर्भ व वाशीम जिल्हा जोरदार पाऊसाची शक्यता.

 

११ ते १३ ऑक्टोंबर पूर्वी सोयाबीन पीक काढून घ्या. वाशिम जिल्हा  कृषी अधिकारी  यांनी पत्रकाद्वारे केले आव्हान

विनायक सुर्वे प्रतिनिधी 

वाशीम:-  मागील हप्त्याची पावसानंतर थोडीशी उघड मिळताच आता वाशीम जिल्ह्यात सर्वत्र सोयाबीन कापणी ला सुरुवात झाली आहे. अशातच हवामान खात्याच्या पूर्व अनुमानानुसार विदर्भात वाशिम जिल्हा ११ ,१२ , व १३ ऑक्टोंबर ला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळे शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान होण्याची नाकारता येत नाही. या करिता शेतकरी बांधवांनी कापणी करून ठेवलेले पीक योग्य ठिकाणी जमा करून मळणी करून घ्यावी व पिकाला पावसामुळे होणारे नुकसान टाळावे. ज्या शेतकऱ्यांची मळणी करणे शक्य नाही अशा शेतकऱ्यांनी जमा केलेल्या सोयाबीनचे योग्यप्रकारे सुडी उंच टेकड्या च्या ठिकाणी लव ताडपत्री येणे सुधारित पाणी जाणार नाही तसेच झाकून ठेवावे. जेणेकरून पावसाचे पाणी सुदित्त जाऊन पिकाचे नुकसान होणार नाही.
खरीप ज्वारी परिपक्व झाली असल्यास कापणी मळणी दिनांक ११/१०/२०२० करून घ्यावी तसेच सलग सोयाबीन शेत्रातील कापणी मळणी पूर्ण झाली असेल रब्बी पिक पेडण्याचे नियोजन १५ ऑक्टोबरच्या नंतर करावे
असे आव्हान वाशिम जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री शंकर तोटावार यांनी पत्रकाद्वारे केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here