लोकसहभागातूनच पर्यावरण चे संवर्धन व संरक्षण शक्य आहे. – श्री चंदनसिंह चंदेल

लोकसहभागातूनच पर्यावरण चे संवर्धन व संरक्षण शक्य आहे. – श्री चंदनसिंह चंदेल

लोकसहभागातूनच पर्यावरण चे संवर्धन व संरक्षण शक्य आहे. - श्री चंदनसिंह चंदेल
लोकसहभागातूनच पर्यावरण चे संवर्धन व संरक्षण शक्य आहे. – श्री चंदनसिंह चंदेल

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

बल्लारपूर :-वन्यजीव सप्ताह २०२१ अंतर्गत वनविभाग बल्लारपूर परीक्षेत्र च्या वतीने आज दि.०७/१०/२०२१ रोज गुरुवार ला बल्लारपूर वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालय,साईबाबा वार्ड बल्लारपूर येथे वन्यजीव सप्ताह कार्यक्रम व रॅली चे आयोजन

लोकसहभागातूनच पर्यावरण चे संवर्धन व संरक्षण शक्य आहे. - श्री चंदनसिंह चंदेल
*मा.श्री चंदनसिंह चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ महाराष्ट्र राज्य व बल्लारपूर तहसीलदार श्री राईंचवार सर* यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.या प्रसंगी मार्गदर्शन करताना आदरणीय बाबुजी यांनी सांगितले की लोकसहभागातूनच पर्यावरण चे संवर्धन व संरक्षण हे शक्य आहे.पर्यावरण जर सुरक्षित राहिले तर मनुष्य जीवन हे सुखी आणि समृद्ध राहील.आजच्या युगात आपण पाहतो आहे वातावरणात मोठा बदल झाला आहे व यामुळे जागतिक तापमान वाढत आहे जे नवीन नवीन संकटांना जन्म देत आहे.यासाठी कारणीभूत आपलाच मानवीय समाज आहे.आपण सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घेऊन आपल्या व आपल्या पुढच्या पिढीसाठी वन आणि वन्यजीव यांचे संरक्षण व संवर्धन केलेच पाहिजे.समाजाला मोठ्या प्रमाणावर यावर जागरूक केले पाहिजे.ही आपली सर्वांची सामूहिक कर्तव्य व जवाबदारी आहे.पर्यावरण चे समतोल राखण्यासाठी वन आणि वन्यजीव हे अत्यंत प्रमुख घटक आहे.या वेळी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी वन जन धन योजना या केंद्रीय योजने अंतर्गत प्रथम चरणात तालुक्यातील कळमना, मानोरा व इटोली या गावातील जंगल लगतच्या शेतकऱ्यांना वन्यजीव मुळे त्यांच्या शेतपिकांच नुकसान टाळण्यासाठी सोलार कुंपण किट च वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन वनपरिक्षेत्र अधिकारी श्री संतोष थिपे यांच्या मार्गदर्शनात झाले.