सावली( वाघ)येथे आ.समिरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते व्यायाम शाळेचे लोकार्पण

*सावली( वाघ)येथे आ.समिरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते व्यायाम शाळेचे लोकार्पण

सावली( वाघ)येथे आ.समिरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते व्यायाम शाळेचे लोकार्पण
सावली( वाघ)येथे आ.समिरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते व्यायाम शाळेचे लोकार्पण

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
हिंगणघाट दि.७ ऑक्टोबर
गावाच्या विकासकामासाठी मी सदैव आपल्या पाठीशी असून कोणत्याहीवेळी मी आपल्या सेवेत तत्पर राहिल असे आश्वासन आमदार समिर कुणावार यांनी सावली येथील आगे बढ़ो व्यायाम शाळेच्या लोकार्पण समारोहाचेवेळी सावली(वाघ) जि.प.मतदारसंघातील गावकऱ्यांना दिले.
काल दि.६ रोजी सावली (वाघ) येथील आगे बढो व्यायाम शाळेचा लोकार्पण सोहळा सावली ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आला होता,याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितिन मडावी,सरपंचा सौ.छाया सुभाष राऊत,प.स.सदस्या सौ.मंजूषा ठक,उपसरपंच अनिल ठक तसेच आगे बढो व्यायाम शाळेचे अध्यक्ष विनोद विटाळे इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार समीरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते व्यायाम शाळेचे फीत कापून रितसर लोकार्पण करण्यात आले.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सावली(वाघ) जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य नितिन मडावी यांनी मतदारसंघात आमदार समिरभाऊ कुणावार यांचे प्रयत्नाने अनेक विकासकामे करता आली असून आमदार कुणावार मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी कधीही कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन केले.