घुग्गुस प्राथमिक आरोग्य केंद्रात युवकांचा धिंगाणा, आरोग्य कर्मचाऱ्यांना धक्काबुकी, तिघांना अटक

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

घुग्घुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काही जणांनी धुमाकुळ घालून कर्मचाऱ्यांना धक्काबुकी करून सामानाची तोडफोड केली. याप्रकरणी तुषार भंडारे, श्रीहरी कुसले, नंदकिशोर कुसले (रा. गडचांदूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

घुग्घुसनजिकच्या नकोडा गावात रात्री गरबा सुरु असताना तीन मुलींची तब्येत अचानक खराब झाली. त्यामुळे काही जणांनी त्यांना उपचारासाठी घुग्घुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचारासाठी भ्रमणध्वनी करून बोलविण्यात आले. त्यातील एका मुलीची तब्बेत गंभीर होती. त्यामुळे संतप्त झालेल्या काही अज्ञात युवकांनी तेथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत सामानाची तोडफोड केली. याप्रकरणी आरोग्य सेविका सुष्मिता उईके यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३५३, २९४ (३४) सहकलम ३ अंतर्गत सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास ठाणेदार बबन पुसाटे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक गौरीशंकर आमटे सुरू आहे. या घटनेची माहिती जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही जाणून घेतली. पोलीस या प्रकरणाची गंभीरतेने चौकशी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here