८ ऑक्टोबर रोजी दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लोकार्पण सोहळा
लोकनेते दि बा पाटील विमानतळ पाहणी दौरा
कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी
९८३३५३४७४७
पनवेल: ८ ऑक्टोबर २०२५ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
बहु प्रतिक्षित नवी मुंबई विमानतळ उद्घाटन सोहळा नामांतराच्या वादात अडकल्यामुळे लांबणीवर पडत होत, अखेर नवी मुंबईकर, मुंबईकर आणि देशातील सर्वच नागरिकांनी अत्याधुनिक सुसज्ज अश्या सेवांनी प्रथम टप्प्यातील लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोहळ्याच्या तयारीची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन भाजपा पदाधिकारी आणि अधिकारी वर्गाने पाहणी केली. नवी मुंबईच्या इतिहासातील हा सगळ्यात मोठा क्षण असून त्या क्षणाचे नवी मुंबईकर साक्षीदार होणार आहेत. दि. बांच्या नावासह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विमान सेवा प्रवाशांना देण्यासाठी सज्ज होणार आहे.
यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री रविंद्र चव्हाण, मा.खासदार रामशेठ ठाकूर, जेष्ठ नेते श्री. जे.एम.म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी , आमदार विक्रांत पाटील यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते.