मातोश्रीच्या दारी लागले चौलचे तोरण
नव्या पोर्णिमेच्या निमित्ताने जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी जपली परंपरा
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- कोजागिरीची नव्या पौर्णिमेच्या दिवसांचे निमित्ताने चौल मधील भाताचे कणसाचे तोरण मातोश्रीच्या दारी बांधण्यात आले. गेले पंचवीस वर्षे शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे हे मातोश्रीच्या दारी चौलचे भाताचे कणीसाचे तोरण बांधले जाते.
स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात मातोश्रीच्या दाराला चौलचे भाताचे कणीसाचे तोरण बांधण्यास सुरूवात झाली, ती परंपरा आजतागायत शिवसेने उबाठा जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी जपली आहे. हे तोरण दसराचे साडेतिन मुर्हूतावर मातोश्रीच्या दारी बांधले जात असे, परंतू दसराचे दिवशी शिवसेनेचा भव्य मेळावा असल्याने हे चौलचे भाताचे कणीसाचे तोरण कोजागिरीच्या नव्या पोर्णिमेला मातोश्रीच्या दारी बांधण्यात आले. चौलचे भाताचे कणीसाचे तोरण बांधण्याची परंपरेस सन 1998 पासून स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांचे आज्ञेने करण्यात आली होती.
या वर्षी कोजागिरीच्या नव्या पोर्णिमेच्या दिवशी जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे हे विभाग प्रमुख मारूती भगत,पेण उपतालुका प्रमुख चेतन मोकळ, उपकार खोत, राजू शेवणईकर, सुनिल घरत, बाळू वर्तक, अल्पेश ठाकूर, राकेश काठे, आदी शिवसेना कार्यकर्ते यांच्यासह मातोश्रीवर पोहचले, यावेळी शिवसेना उबाठा पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी चौलचे भाताचे तोरण शिवसेना उबाठा पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना सुपूर्द केले.
चौलच्या भाताचे कणीस तोरणासाठी लांब भाताचे कणीसाची निवड करावी लागते, यासाठी चौलचे राकेश काठे या कुशल कारागिर हे आकर्षक व सुबक असे भाताचे कणीसाचे तोरण बनवितात.