नवी मुंबई वाहतुक पोलिसांचा मोठा निर्णय
विमानतळ उद्घाटनामुळे अवजड वाहनांना बंदी
कृष्णा गायकवाड
प्रतिनिधी
९८३३५३४७४७
नवी मुंबई/ बेलापूर:
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनामुळे अवजड वाहनांना नवी मुंबई वाहतुक पोलिसांनी बंदी घातल्याच मोठा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन ८ ऑक्टोबरला होणार आहे. या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याच्या पार्श्वभुमीवर सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबई वाहतुक पोलिसांनी अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू केली आहे.
हा बदल ८ ऑक्टोबर सकाळी ६ १० ते रात्री पर्यंत लागू असेल.
विमानतळ कार्यक्रमा प्रसंगी पनवेल, रायगड तसेच परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे .