संतोष जंगम “गुणवंत कर्मचारी पुरस्काराने” सन्मानित

81

संतोष जंगम “गुणवंत कर्मचारी पुरस्काराने” सन्मानित

संतोष जंगम "गुणवंत कर्मचारी पुरस्काराने" सन्मानित

म्हसळा: संतोष उद्धरकर.

म्हसळा: अविष्कार फाऊंडेशन, कोल्हापुर यांच्या तर्फे देण्यात येणारा गुणवंत कर्मचारी पुरस्काराचे म्हसळा न्यु इंग्लिश स्कूल चे कर्मचारी संतोष जंगम हे मानकरी ठरले असुन हा पुरस्कार सोहळा पोलादपूर येथे मोठ्या दिमाखात पार पडला, संतोष जंगम हे गेली ३२ वर्ष आपल्या सेवेत कार्यरत असून २७ वर्षे न्यु इंग्लिश स्कुल म्हसळा इथे शिपाई कर्मचारी म्हणून आपली सेवा ईमानदारीने पार पाडत असतांना आजवर त्यांना २०१७ ला जैन संघ व सर्वज्ञ आधार फाऊडेशनचा उत्कृष्ठ कर्मचारी पुरस्कार, २०२० ला कोकणरत्न पुरस्कार, २०२१ ला महत्वाचा पुरस्कार म्हणजे रायगड जिल्हा परिषदचा शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार प्राप्त झाले असल्याने यावेळी संतोष जंगम यांना अविष्कार फाऊडेशन तर्फे गुणवंत कर्मचारी पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी फाऊडेशनचे अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष सोपान चांदे,हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया,माजी जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, उद्योगपती संजय जाधव, किशोर मोहिते, माजी उपसभापती शैलेश सलागरे, आदि मान्यवर उपस्थित होते.