शेकाप च्या वतीने पेझारी येथे रास्ता रोको
रस्त्यावरील खड्डे त्वरित भरावे या साठी केले होते आंदोलन
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- अलिबाग वडखळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्या मुळे प्रवासी,वाहन चालक, पर्यटक यांना होणारा त्रास या बाबत रस्ता दुरुस्ती बाबत वारंवार निवेदन देऊनदेखील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे शेतकरी कामगार पक्षाने आक्रमक होत आज (दि.7) पेझारी चेक पोस्ट येथे रास्ता रोको आंदोलन केले.
सकाळी 9.30 वाजल्यापासून रस्त्यावर ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली. शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दाखवली.
सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी कामगार पक्ष कायमच पुढे आला आहे. आता सर्वसामान्यांना चांगले रस्ते मिळावे, खड्डेमय रस्त्यांविरोधात शेकाप मार्फत एल्गार पुकारला आहे. गणपती पूर्वी रस्त्याची डागडुगी तात्पुरत्या स्वरूपात केली गेली मात्र ती वरचेवर करण्यात आल्याने पुन्हा रस्त्याला खड्डे पडले आहेत. याबाबत वारंवार निवेदने दिली गेली मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही त्यामुळे नाईलाजास्तव रस्त्यावर उतरावे लागत असल्याचे शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील ह्यांनी सांगितले. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत येथून हलणार नसल्याचा निर्धार घेऊन कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला होता. लेखी आश्वसनामध्ये दिवाळीपूर्वी रस्ते झाले पाहिजेत, रस्त्याची कामे हि दर्जेदार व्हायला हवीत, निधी किती आला आणि किती खर्च झाला ह्याचा तपशील हवा अश्या मुद्दे ह्यामध्ये समाविष्ट हवेत अशी मागणी चित्रलेखा पाटील ह्यांनी केली होती.
लोकप्रतिनिधींना रस्त्याकडे बघायला वेळ नाही. गणेशोत्सवासह नवरात्रौत्सवही खड्डयातून गेला. मात्र याकडे विद्यमान आमदारांनी जाणीव पुर्वक दुर्लक्ष केले आहे. सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.प्रशासनाला जाब विचारायची वेळ आली आहे. हे विचारण्यासाठी आज शेकाप रस्त्यावर उतरला असल्याचे मानसी म्हात्रे ह्यांनी सांगितले.
गणपतीपूर्वी पेण येथे जाऊन आम्ही कार्यकारी अभियंता घेतली मात्र आजही परिस्थिती जैसेथे आहे असेही त्या कार्यकर्त्यांना संबोधताना म्हणाल्या.
या वेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकाची भेट घेतली. आणि दिवाळीपूर्वी रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल असं आश्वासन दिले. लेखी आश्वासन दिल्यावर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. दिवाळीपर्यंत रस्ता झाला नाही तर आणखी तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेकापकडून देण्यात आला.
दीड तास रास्ता रोको करण्यात आला होता. यावेळी शाळेच्या विदयार्थी वाहतूक, अम्बुलन्स यासारख्या वाहनांना प्राधान्याने सोडण्यात आले होते. त्यानंतर वाहतूक सुरळीत पने सुरु झाली. यावेळी शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील , शेकाप राज्य महिला आधाडी प्रमुख मानसी म्हात्रे ,मा नगराध्यक्ष प्रशांत नाईक,शेकाप जिल्हा सहचिटणीस अँड.गौतम पाटील, अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत , नरेश म्हात्रे ,अनिल गोमा पाटील विजय गीदि , विलास म्हात्रे, नागाव सरपंच हर्षदा मयेकर सोनाली मोरे, सुधीर थळे, संजना किर, नागेश कुलकर्णी यासह वेगवेगळ्या आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते जनता रस्ता रोको मध्ये उपस्थित होते. .
रास्ता रोको साठी पोलीस प्रशासनाने चांगले सहकार्य केले . वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलीस यासंह पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तला होते.