नैराश्यातून सॉफ्टवेअर इंजिनिअरने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या.

लखनऊ:- कोरोना महामारीचा प्रकोप अजूनही सुरूच आहे. त्यातच आता त्याचे इतर दुष्परिणामही समोर येत आहेत. कोरोना रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले. अनेकांची पगारकपात झाली. त्यामुळे अनेकांना मानसीक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच अनेकांना नैराश्य आले आहे. लखनऊमध्ये नैराश्यातून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

लखनऊमधील राहुल नावाच्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. लखनऊमधील नीलमडी लॉजच्या पहिल्या मजल्यावर तो राहत होता. तो मूळचा बलिया जिल्ह्यातील असून लखनऊमध्ये एका खाजगी कंपनीत कामाला होता. गेल्या काही महिन्यांपासून तो नैराश्यात होता. या नैराश्याच्या भरात शुक्रवारी संध्याकाळी त्याने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छदेनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेची माहिती राहुलच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. याबाबत तापस करत असून माहिती घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून राहुल नैराश्यात असल्याची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.

लखनऊमधील एका खासगी सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या राहुलला यावर्षी कॅनडाला जायचे होते. त्यासाठी त्याची तयारीही सुरू होती. मात्र, कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन घेण्यात आला. या लॉकडाऊनमुळे राहुल कॅनडाला जाऊ शकला नाही. त्यातच त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला. त्यामुळे तो तणावात होता. तसेच त्याच्या खोलीत एनर्जी ड्रिंक आणि काही औषधे सापडली आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

कोरोना संकट, लॉकडाऊन, कॅनडाला जाता न आल्याचा तणाव आणि रद्द झालेला व्हिसा यामुळे राहुलचे नैराश्य वाढले होते. त्यामुळे त्याने टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. त्याने अवैध पिस्तूल मिळवून शुक्रवारी संध्याकाळी त्यातून स्वतःवर गोळ्या झाडत आत्महत्या केली. याप्रकरणी अधिक तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here